Uncategorized

भविष्यात धरती हिरवा शालू नेसेल : ॲड.अर्चना माने

चौकट: परजना येथील हेमाडपंथी महादेव मंदिर टेकडी परिसरात वृक्षारोपण संपन्न.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- श्रावण महिन्यातील पवित्र दुसऱ्या श्रावण सोमवारी उमरखेड तालुक्यातील परजना येथील महादेव मंदिर टेकडीवर श्री तेजमल गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा वृक्षलागवडीचा उपक्रम भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेच्या वतीने मागील अनेक वर्षापासून राबविल्या जात असुर दरवर्षी हजारो वृक्ष लागवड या उपक्रमा अंतर्गत करण्यात आले असल्यामुळे पर्जना टेकडी आणि हा परिसर नक्कीच भविष्यामध्ये हिरवा शालू परिधान करेल यासाठी आपण भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मत अध्यक्ष भाषणातून अँड अर्चना विजयराव माने यानी व्यकत केले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विचार व्यक्त करतांना महादेव मंदिर संस्थान समितीचे सचिव श्री विश्वासराव वाघमारे यांनी डॉ.विजयराव माने साहेब यांनी याच पवित्र स्थळा वरून मागील वर्षी 5000 वृक्ष लागवडीचा केलेला संकल्प पूर्ण केल्याने आनंद व्यक्त केला व महादेव मंदिर परिसर व टेकडीवर झालेला जो विकास आहे त्यासाठी डॉ. विजयराव माने साहेब यांचे मोठे योगदान असल्याचे मत व्यक्त करून या कार्याबद्दल त्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम या ५००० वृक्ष लागवडीच्या संकल्पातील तिसरा आणि शेवटचा टप्पा असून या मध्ये १०० वृक्ष मंदिर परिसरात रोपण करून ९०० वृक्ष विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महादेव मंदिर संस्थान परजना यांच्या वतीने ॲड.अर्चनाताई माने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ब्राह्मणगावचे प्रतिष्ठित नागरिक रत्नाकर अण्णा मुक्कावार चातारीचे प्रतिष्ठित नागरिक दादारावजी माने, नयन भाऊ पुद्दलवाड, अरविंदराव धबडगे, निळकंठ वाघमारे ,विश्वासराव वाघमारे, अंकुशराव वाघमारे ,संजयराव वाघमारे, संजयराव सावंत , दत्तरावजी माने, अशोकराव माने , माधवराव जोयजड, पंडितराव सावंत , दादाराव सोळंके, गजानन वाघमारे ,रामराव शिंदे , पत्रकार विजयराव कदम, सादुडे सर, खोकले सर, गावंडे सर, शिरफुले सर, देवस्थान समितीचे सर्व सदस्य भक्त मंडळी शिक्षक मंडळी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी श्री पंजाबराव नारायणराव वाघमारे, माधवराव शामराव माने, शंकरराव दत्तराव माने व आकाश बाबुराव माने यांचेकडून उपस्थित विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन श्री सुनील वानखेडे प्रास्ताविक प्राचार्य सादुडे सर व स्व.भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँकेचे अध्यक्ष श्री अशोकराव शिरफुले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
========–=========

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button