करंजी ग्रामपंचायत मार्फत कृषी सहाय्यकांना निरोप समारंभ!

महागाव प्रतिनिधी संजय नागरगो
जेमहागाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी एका छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बदली होऊन इतरत्र जाणारे पाटील यांना निरोप देण्यात आला. तर नव्याने रुजू झालेले झरीवाड यांचे स्वागत करण्यात आले. कृषी सहायक पाटील यांनी गावात मागील सात वर्ष उत्कृष्ट सेवा दिल्याने गावकऱ्यासोबत ऋणानुबंध वाढले. गावकऱ्यांनी त्यांना निरोप देत त्यांच्या कार्याची जणू पावतीच दिली. 30 जुलै रोजी मंगळवारी करंजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी निरोप देण्यात आला. त्यांनी करंजी गावात मागील सात वर्षापासून उत्कृष्ट सेवा दिली. त्यांची इतरत्र बदली झाल्याने सरपंच तातेराव वानखेडे यांनी करंजी ग्रामपंचायत कार्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केले होते. ग्रामस्थामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि नव्याने रुजू झालेले कृषी सहायक मनोज कुमार झरीवाड यांचे प्रसंगी स्वागत करण्यात आले. कृषी सहाय्यक गणेश पाटील यांनी करंजी या ठिकाणी सतत सात वर्ष सेवा कार्यकाळ सांभाळला. या ठिकाणी कार्यरत असतांना कृषी सहाय्यक पाटील यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत विकासात्मक कामे केलीत. शासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती संदर्भातील अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला. कृषी विभागामार्फत मिळणारे कृषी साहित्य, आणि शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या वाढीसाठी योग्य मार्गदर्शन, कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रभावी उपाययोजना संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले. करंजी येथील अनेक शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळणाऱ्या योजनांची माहिती देऊन ग्रामस्थ सोबत सात वर्षांच्या कार्यकाळात उत्तम संबंध जोपासत जिव्हाळा निर्माण केला. लहान असो मोठा असो प्रत्येकांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केल्याने करंजी येथील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक गणेश पाटील यांची इतरत्र बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. कृषी सहाय्यक पाटील यांनी करंजी ग्रामस्थ सोबत उत्कृष्ट सेवा दिल्याने ते शेतकरी मित्र ठरले. निरोप समारंभा प्रसंगी पाटील यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. पाटील यांच्या ठिकाणी नव्याने कृषी सहाय्यक म्हणून मनोजकुमार झरीवाड यांची नियुक्ती झाली. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांनी त्यांचे या वेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी करंजी येथीलसरपंच तातेराव वानखेडे यांनी गणेश पाटील यांच्या कार्याचा गौरव करून शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केल्याने त्यांचे कौतुक केले. तर नव्याने रुजू झालेले कृषी सहायक मनोजकुमार झरीवाड यांचे स्वागत करून पुढील कार्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी उपसरपंच सुधाकर राठोड, कृषी उत्पन्न समितीचे सदस्य माधवराव सुरोशे, माजी सरपंच नागोराव वराडे, माजी सरपंच सुनील वराडे, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन तळणकर, ऑपरेटर विकास राठोड, आर. डी. काळे, राजू राठोड, योगेश ठाकरे, मारुती तळणकर, रमेश ठाकरे यांचे सह मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.



