Uncategorized

कोदंरी फाटा ते चिखली मलकापूर पांदण रस्त्याची दुर्दशा!

या रस्त्याचे काम मंजूर होऊनही अनेक वर्षांपासून प्रलंबीत

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागांव तालुक्यातील कोदंरी फाटा ते चिखली मलकापूर येथे जोडणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून मंजूरात होऊनही प्रलंबितच आहे. वाकान, कोदंरी परिसरातील जवळपास ७०% शेतकऱ्यांची शेती या मार्गावर जोडल्या जात असुन आता पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने पायदळ चालने देखील खुपच कठीण झाले आहे अनेक शेतकऱ्यांची गुरे,ढोरे याच रस्त्यांच्या मार्गाने जातात मात्र हा रस्ता अतीशय चिखलमय झाल्याने शेतकऱ्यांना व मजुर वर्गाना या रस्त्याने शेत कामासाठी जातांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.या मतदार संघातील कोणताही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देन्यास तयार नाही आहे.केवळ मतदान जवळ आल्यावरच या गावाकडे नेतेमंडळी व पुडारी मतदान मागण्यांसाठी फीरकत असतात व त्यांच्या इच्छेनुसार मतदान केल्यावर खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बाराणा अशी परिस्थिती या परीसरातील गांवाची झाली आहे.केवळ मतदानापुरतेच अनेक आश्वासने या गावातील नागरिकांना दिले जातात मात्र त्यानंतर केराची टोपली दाखवली जातात.कोदंरी फाटा ते चिखली मलकापूर या रस्त्याचे काम शासकीय स्तरावर मंजूर होऊन पडले आहे मात्र आजपर्यंतही या भागातील आमदार, खासदार,जि.प.अध्यक्ष, सभापती, किंवा प.समीती सदस्य हे अनेक वेळा या मतदारसंघातुन निवडुन आले आहेत.परंतु आजपर्यंतही या मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाविषयी धाडस करून काम सुरू केले नाही.त्यामुळे येथील नागरिकांना अतीशय दैनिय अवस्थेत या रस्त्याने पायदळ प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधुन चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.या गंभीर समस्येकडे मतदार संघातील आमदार, खासदार यांनी लक्ष केंद्रित करून या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम सुरू करन्याची मागणी आता जोर धरत असून येणाऱ्या काळात या रस्त्याच्या कामासाठी आमरण उपोषण करन्याचा इशारा परिसरातील नागरिकांमधुन दिल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button