Uncategorized

फुलसावंगीच्या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर प्रश्नचिन्ह महागाव तालुक्यातील कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध जुगार; पोलिसांच्या भूमिकेवर संशय


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील फुलसावंगी परिसरात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल जुगार अड्ड्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फोटोमध्ये नमूद केल्याप्रमाणे, मागील काही महिन्यांपासून येथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असून दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे समोर आले आहे.
या अड्ड्यावर केवळ स्थानिकच नव्हे, तर आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यांतील जुगारप्रेमी मोठ्या संख्येने येत असल्यामुळे येथे गर्दी वाढत आहे. याठिकाणी अँडी, फनटूर, इंद्रा, क्रेटा, सफारी यांसारख्या महागड्या वाहनांची वर्दळ दिसून येत असून, हा जुगार अड्डा ‘हाय-प्रोफाइल’ स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, या अवैध जुगारामुळे अनेक गरीब कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळत असून, तरुण वर्ग व शेतकरी यामध्ये अडकत असल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत, संबंधित जुगार अड्ड्याला काही अधिकाऱ्यांचे आणि राजकीय घटकांचे पाठबळ असल्याची शंका व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात स्थानिक पोलीस तसेच एलसीबी पथकाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती आणि गृह विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
महागाव तालुक्यात उघडपणे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर तात्काळ कारवाई करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button