शहर

महागाव–सवना ग्रामीण रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह; चौकशीची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी


महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव व सवना येथील ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णवाहिका सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा आणि रुग्णवाहतुकीबाबत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोपानुसार, सवना ग्रामीण रुग्णालयातील शिवाजी गावंडे चालकाकडून शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे किंवा इंधन नसल्याचे कारण सांगून प्रसूती झालेल्या महिलांसह इतर रुग्णांची वाहतूक स्वतःच्या खासगी वाहनातून शुल्क घेऊन केली जात असल्याचा आरोप आहे. संबंधित चालक शासकीय सेवेत असतानाही खासगी वाहनाचा वापर करून आर्थिक लाभ घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
तसेच महागाव ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उपलब्ध असूनही चालकांची नियुक्ती नसल्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी अनेक रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महागाव ग्रामीण रुग्णालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना क्षारयुक्त पाणी पिण्याची वेळ येत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयात केवळ एकच सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याने रात्रीच्या वेळी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित चालकाच्या कार्यपद्धतीची, रुग्णवाहिका सेवेची, इंधन खर्चाची तसेच खासगी वाहनाद्वारे रुग्णवाहतूक केल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच महागाव व सवना ग्रामीण रुग्णालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, चालक, सुरक्षा रक्षक आणि मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शिवाजी गावंडे हा योजनेचा अध्यक्ष चा लाभ घेऊन मनमानी कारभार करत असल्याने स्वतःच्या गाडीचा उपयोग खाजगी वाहना करता खुलेआम करताना चित्र पाहायला मिळत आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार जिल्हा चिकित्सक यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button