प्रभाग क्रं १ मधील नविन देशी दारू दुकानाची दिलेली एनओसी सभागृहात सर्वानुमते रद्द ! ज्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी शहरांसोबत बेईमानी करून हात ओले केले त्यांना पैसे परत द्यावे लागणार !

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव नगरपंचायत मध्ये नवीन देशी दारू दुकानाला 17- 2 -2023 रोजी ठराव क्रमांक 27 नगरसेवकाला अंधारात ठेवून घेण्यात आला होता.त्यावर अनुमोदक म्हणून प्रमोद भरवाडे सूचक म्हणून करूणा शिरबिडे व ठराव रजिस्टर वर नगरपंचायत तत्कालीन अधक्ष्या करुणा शिरबिडे यांची सही आहे.हे रजिस्टर अंधारात ठेवून सभेच्या नोटीसमध्ये दारू दुकान एनओसीचा विषय नसताना ठराव घेतला कसा ? म्हणून सत्ताधारी व विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ही बाब समोर आली .देशी दारू दुकानचा ठरावाचा थांग पत्ता इतर नगरसेवकांना न लागू देता काही शाकीर नगरसेवकांनी परस्पर केल्याचे निर्देशनास आले.त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप करत पत्रकार परिषद घेतली .त्यामध्ये आमचे तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे यांनी ठराव रजिस्टर ची कॉपी पत्रकार परिषदेमध्ये दाखवली असता सर्व नगरसेवकाने अंग झटकले. न.प मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर यांनी 28 एप्रिल 2025 रोजी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळे हा प्रकार उघड झाला. जामनोर हे अमरखेड येथे कार्यरत असून ते प्रभारी मुख्याधिकारी म्हणून महागाव नगरपंचायतला आहेत .सत्ताधारी पक्षाने 24 एप्रिल 25 रोजी सर्वसाधारण सभा नोटीस मध्ये विषय घेऊन त्या सभेमध्ये देशी दारू दुकानाला दिलेला ठराव मुख्य अधिकारी न . प .यांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र 17 नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक यांनी रद्द करून ठराव सर्वानुमते पास केला.व त्या घेतलेल्या ठराव रजिस्टर वर अध्यक्षाची सही डुप्लिकेट असल्याचे मागील अध्यक्ष यांनी सभागृहात सांगण्यात आले .व पुढील कारवाई सुरू झाली.परंतु घेतलेला ठरावा बाबत खुलासा होणे बाकी आहे.त्यामुळे हा नकली ठराव कोणी केला ? या बाबत लेखी तक्रार पोलीस स्टेशनला देण्याचे उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे यांनी सांगितले. विरोधी पक्षाचे सुरेश नरवाडे रामराव पाटील सौ . नरवाडे असे अकरा नगरसेवक यांनी कोणत्याही हालतीत प्राण गेली तरी बेहत्तर पण देशी दारूचे दुकान प्रभात क्रमांक एक मध्ये सुरू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन प्रभाग क्रमांक एक मधील महिलेसह आंदोलन करण्याचा इशारा दिल्यामुळे ठराव घेणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.लवकरच पितळ उघड होणार मुख्यअधिकारी महेश जामनोर यांनी दिलेली एनओसी रद्द करणार का? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.ज्यांनी हा कार्यभाग केला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे !



