Uncategorized

महागाव नगरपंचायतीच्या विषय समीती व स्थायी समितीचे गठन !


न. प. अध्यक्ष्या सुनंदा कोपरकर स्थायी समिती पदसिद्ध सभापती ! तर उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे स्वच्छता , सार्वजनिक आरोग्य समिती सभापती !
(, ज्येष्ठ सदस्य संभाजी नरवाडे स्वीकृत सदस्य यांनी केले अभिनंदन, स्वागत)
( भाग दोन)


महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे

जिल्हा अधिकारी यांचे पत्र १६ । ७ / २०२५ न. प. स्थायी विषय समिती निवडणूक घेण्याबाबत सर्व नगरसेवक यांना नोटीस देऊन आज दिनांक 25 -7 -2025 रोजी महागाव नगरपंचायत मध्ये 11 ते 3 च्या सुमारास उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिकारी त्यांनी प्रस्तुत केलेले निवडणूक अधिकारी तहसीलदार महागाव यांनी सभागृहात स्थायी समिती गठीत झालेले जाहीर केले व त्याचे वाचन केले .मुख्य कार्यकारी अधिकारी न. प. व सर्व कर्मचारी उपस्थित असताना त्यामध्ये सुरोशे सुनंदा दिलीपराव अध्यक्ष न .प.पदसिद्ध सभापती स्थायी समिती तर भरवाडे प्रमोद रामराव उपाध्यक्ष न .प.सभापती स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती जाहीर करून विशेष सभेची कारवाई पार पाडण्यात आली व तसे सभागृहामध्ये वाचन केले त्यावर कोणत्याही नगरसेवकाने आक्षेप घेतले नाही . अकरा नगरसेवक अन उपस्थित असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली त्या समितीमध्ये रिक्त पद सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आणि जलनिस्तारात व महिला बालकल्याण हे तीन पद 11 नगरसेवक उपस्थित नसल्यामुळे रिक्त राहिले त्यावेळेस निवडून आलेले सभापती अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे स्वागत जेष्ठ नेते संभाजी नरवाडे यांनी सभागृहात केले परंतु पुढे महाभारत काय हे पुढील अंकात वाचा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button