पार्डी ते वाणेगाव व बीएसएनएल टॉवर ते सुमेध बोधी बुद्ध विहारकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम त्वरित करा……….वंचित बहुजन आघाडी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
तालुक्यातील पार्डी ते वाणेगाव येथील रस्त्याचे काम योगेश पांडे नामक कंत्राटदाराने घेतले असून मागील वर्षीच्या पावसाळ्यापूर्वीपासून संबंधित कंत्राटदार काम पूर्ण न करता गावातील महिला पुरुष शाळकरी मुले अबालवृद्ध यांच्या जीवनाशी खेळत आहेत
हा रस्ता आज रोजी अक्षरशा चिखलमय झाला मागील पावसाळ्यासह आज सुद्धा या रस्त्यावरून ये जा करताना अनेकांचे छोटे-मोठे अपघात झाले सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही परंतु रस्त्याचे काम त्वरित न केल्याने या रस्त्यावरील अपघातात कुणाचे बरे वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब संबंधित ठेकेदारास आम्ही मागील वर्षापासून सांगत आहोत परंतु हे ठेकेदार महाशय या गोष्टीकडे हेतू पुरस्कर कानाडोळा करीत आहेत स्वतःच्या फायद्यासाठी वारंवार कामाची मुद्दत वाढून घेत आहेत.
गावातील प्रसुती महिला आजारी व्यक्ती यांना दवाखान्यात जाताना काही बरे वाईट झाले तर या गोष्टीस कंत्राटदार व शासन जबाबदार धरण्यात येईल

याचवेळी उमरखेड शहरातील बीएसएनएल टॉवर ते सुमेध बोधी बुद्ध विहार बोरबन उमरखेड येथील रस्ता प्रचंड चिखलमय झाला असून रस्त्यालगत सुमेधबोधी बुद्ध विहार आहे बौद्ध धम्मामध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या व सतत तीन महिने चालत असलेल्या वर्षावासाचे आयोजन बुद्ध विहारात समाजाच्या वतीने केले असून या वर्षावासामध्ये धम्मज्ञान घेण्यासाठी परिसरातील उपासक उपासिका दररोज जात असतात जवळपासच्या सर्व शाळेतील विद्यार्थी याच रस्त्यावरून ये जा करतात रस्त्यावरील चिखलामुळे नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत आहेत जनतेच्या जीवाशी न खेळता हा रस्ता तात्काळ बांधून द्यावा अन्यथा सर्व जनतेच्या तथा या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अनुक्रमे उप अभियंता बांधकाम उपविभाग उमरखेड व मुख्याधिकारी नगरपरिषद उमरखेड यांना निवेदनाद्वारे देण्यात आला या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी के दामोधर, तालुका अध्यक्ष संबोधि गायकवाड, संतोष गायकवाड, सचिन खंदारे ,पी एल आठवले, केशरबाई पाईकराव अध्यक्ष सावित्रीबाई फुले महिला मंडळ, गणेश वाठोरे, शेख दानिश ,शेख सलीम शेख मुनीर ,संभाजी बहादुरे इत्यादींच्या सह्या आहेत.



