Uncategorized

पोखरी येथे मटका, जुगार,दारू खुलेआम सुरू! पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष,

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागांव : तालुक्यातील पोखरी (ई.) येथे मटका, जुगार, दारू, या अवैध धंद्याला चांगलाच उत आला असून अवैध धंदे चालकांनी आता डोके वर काढले आहेत.येथे आजुबाजुच्या बाहेर गावातील व तालुक्यातील काही अवैध धंदे चालक मटका, जुगार, खुलेआम चालवत असुनही पोलीस प्रशासन मात्र गप्प बसून दुर्लक्ष करीत असल्याचे बोलल्या जात आहे.या अवैध मटका, जुगार,दारुमुळे येथील तरुण पिढी व गोरगरीब रोजमजुर वर्ग मटका, जुगार दारूच्या आहारी जाऊन दिवसभर रोज मजुरी करून कमवलेली कमाई मटका, जुगार दारू मध्ये गमावत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येऊन कुटुंबामध्ये झगडे तंटे निर्माण होतांना दिसत आहेत.व येथे व्यसनाधीनची संख्या वाढतच चालली आहे. येथे खुलेआम सुरू असलेल्या मटका, जुगार दारू विक्री करणाऱ्याला पोखरी गावचा विरोध होत आहे मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने धाड टाकून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने अवैध धंदे चालकांचे पोलिस प्रशासनासोबत मधुर संबंध असल्याची चर्चा पोखरी परिसरात होत आहे.करीता महागांवचे विद्यमान ठानेदार साहेब यांनी पोखरी येथे खुलेआम सुरू असलेल्या मटका, जुगार, दारू चालकावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button