Uncategorized

महागाव तालुक्यात अवैध जुगारावर कारवाईची मागणी


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातील मौजा फुलसावंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ अवैध जुगार सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात भीमज्योती मंडळ, फुलसावंगी यांच्या वतीने महागाव पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित ठिकाणी दिवस-रात्र जुगार सुरू असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पुलाजवळ मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याने सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याबाबत संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून अरेरावीची वर्तणूक केली जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ चौकशी करून अवैध जुगार बंद करण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन ६ एप्रिल २०२६ रोजी सादर करण्यात आले असून, आता पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button