उमरखेड उपविभागीय अधिकारी यांनी अनाधिकृत प्लॉट धारकांकडून 4,28,0320 बोजा चढवायचे आदेशखंड 1 व 2 तलाठी आर्थिक व्यवहार करून तलाठी वर कारवाई करेल का उपविभागीय अधिकारी

सर्वे नं. 169/4 याच्यावर बोजा चढव म्हणून उपविभागीय अधिकारी यांनी आदेश केले आहे उमरखेड खंड एक-दोन चे पटवारी यांनी अनधिकृत धारागाकुल देवाणघेवाण केला आहे त्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी.
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोज
उमरखेड नगरपालिका हद्दीमध्ये अनाधिकृत येणे न करता शासनाचे नियम डावरलून बेकायदेशीर स्वतः नकाशे तयार करून खंड 1 व 2 मध्ये बेकायदेशीर स्टॅम्पवर विक्री केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान शेख इसा तसेच उमरखेड वार्ताचे संपादक यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्यावर त्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीची दखल घेऊन तहसीलदार व विभागीय अधिकारी व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी पटवारी व मंडल अधिकारी यांचा अहवाल मागितला त्या अहवालामध्ये खंड 1 मध्ये शेत सर्वे नंबर 89/१/ड मधील क्षेत्रफळ o. 79 हे. आर. ही जमीन अनाधिकृत आकर्षक वापर करीत असल्यामुळे तलाठी यांनी दंडात्मक अहवाल पाठविला त्यावरून तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल 1966 चे कलम 45 चा वापर करून नियमन ( जमिनीचा वापर व आकर्षक आकारणी) 1969 नियम आठ मधील तरतुदीनुसार 1)शेख जुबेर शेख समद कुरेशी 2) शेख सद्दाम शेख समद कुरेशी या तिघांकडून 2022400 रुपये दंड वसूल करण्याचे नोटीस दिनांक 11-7- 2023 रोजी कलम 45 प्रमाणे नोटीस देण्यात आली. व तसेच शेत सर्वे नंबर 91/2/ ब क्षेत्रफळ 0.84 आर या जमिनीवर अनाधिकृत बेकायदेशीर आकुर्षक वापर करीत असल्यामुळे (जमिनीचा वापर व आकर्षक आकारणी) नोटीस 4) शेख समज शेख रहमान यांना दंड 22 57 920 रुपयाची दंडात्मक नोटीस देण्यात आली . तहसीलदार यांनी आपल्याकडील प्रकरण रामा क्र/09/एन ए पी-36/2023-24 दी-4-3-2024 रोजी दिलेला वसुलीचे आदेश निकाली काढले. त्यावरून त्यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे अपील दाखल केले .त्या प्रकरणात संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करून व पुराव्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी उमरखेड खंड 2 सर्वे नं. 169/4 दिनांक 29 /3 /2025 रोजी आदेश पारित करून तहसीलदार उमरखेड यांचा पूर्वी दिलेला आदेश 04/03/2024 चा कायम ठेवल्यामुळे तहसीलदार यांनी केलेल्या दंडाची रक्कम मंडल अधिकारी व पटवारी यांनी आज पर्यंत वसुली न केल्यामुळे त्यांचे संबंधिता सोबत संघत मत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याबाबत तक्रार करता शेख ईरफान शेख ईसा यांनी तहसीलदार यांना दिनांक 20 -6 -25 रोजी लेखी पत्र देऊन संबंधितांकून दंडाची रक्कम रुपये 42 80 320 रुपये (42 लाख 80 हजार 320) वसूल करून शासन जमा करावे व तलाठी मंडळ यांनी आदेशाचे पालन न केल्यामुळे त्यांना सुद्धा एवढेच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करून संबंधितांकडून रक्कम वसूल करून शासन जमा करावी अन्यथा न्यायालयात दात मागावी लागेल व त्याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी व कर्मचारी उमरखेड खंडे चे अधिकारी व पटवारी यांनी अन अधिकृत लेआउट वाल्या सोबत आर्थिक व्यवहार केले आहे असे तक्रार करते यांना वाटत आहे उमरखेड खंडे 1 व 2 पटवारी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदाराकड केली आहे असे लेखी निवेदन दिले आहे.



