शहर

सुजाता बनसोड ठाणेदार यांच्या बदलीसाठी एक डिसेंबरला ढाणकी बंद.


सर्वपक्षीय नेत्यांनी दिले एसपींना स्मरणपत्र .

शेख इरफान मुख्य संपादक

मो.9021233696


बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या तात्काळ बदलीसाठी ढाणकी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना आज स्मरण पत्र दिले . 23 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात बिटरगाव पोलीस स्टेशन च्या हद्दी मध्ये अवैद्य धंदे फोफावले असून त्याला ठाणेदार सुजाता बनसोड यांची मुकसंमती असल्याचे नमूद आहे. शहरात व परिसरात गावठी दारू, मटका, जुगार, या सारख्या अवैध धंद्यांनी तोंड वर केलेले आहे. शहरातली वाहतूक व्यवस्था तर खोळंबलेली असून यावर सुद्धा बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार कोणतीही ठोस उपाययोजना करू शकल्या नाही. एकंदरीत त्यांच्या कार्याचा आलेख हा सतत ढासळत राहिला असून त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे

संतापलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी व गावकऱ्यांनी ठाणेदार यांची तात्काळ बदली करण्याची मागणी 23 नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली होती त्यामध्ये त्यांची बदली झाली नाही तर एक डिसेंबर रोजी शहर बंद ठेवण्याची म्हटले होते . आजपर्यंत पोलीस अधीक्षक साहेबांनी यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने शहरातील नेत्यांनी व नागरिकांनी पोलीस अधीक्षक यांना आज स्मरण पत्र देऊन कारवाईची मागणी केली अन्यथा एक डिसेंबर रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सुरेशजी जयस्वाल नगराध्यक्ष ढाणकी, बाळासाहेब चंद्रे पाटील सभापती कु उ बा समिती, दत्त दिगंबर वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजप, आनंदराव चंद्रे पाटील ज्येष्ठ नेते भाजपा, संजय कुंभरवाड शिवसेना तालुका प्रमुख, सादिक शेख

तालुका अध्यक्ष म न से, शेख जहीर जमीनदार मा. उपाध्यक्ष न प ढाणकी, गणेशराव नरवाडे उपाध्यक्ष खरेदी विक्री संघ, रमेशराव गायकवाड मा. जि प सदस्य, बंटी जाधव शहर प्रमुख शिवसेना ढाणकी, रोहित वर्मा शहर प्रमुख भाजपा ढाणकी, भास्कर चंद्रे पाटील शहर अध्यक्ष राष्ट्रवादी ढाणकी, सय्यद माजिद तालुका प्रमुख प्रहार, अमोल तुपेकर शहराध्यक्ष काँग्रेस, रुपेश भंडारी तालुका अध्यक्ष व्यापारी महासंघ, करण भरणे जिल्हा उपाध्यक्ष भीम टायगर सेना, प्रवीण मिराशे तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट, सुदर्शन रावते तालुकाध्यक्ष भाजपा उमरखेड, उमेश योगेवार नगरसेवक न प ढाणकी, कृष्णा मुखिरवाड, सुनील कदम, जॉन्टी विनकरे महासचिव वं. ब. आघाडी इत्यादींनी स्मरण पत्रावर स्वाक्षरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button