साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसराआमदार माधवराव पाटील जवळगावकर

हादगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
संत महंत या महामात्म्यांनी समाजाला योग्य दिशा देण्यासाठी केलेल्या त्यांच्या विचारावर आपण चालावे म्हणून ह भ प महाराज मंडळी संतांच्या विचारधारा ची पेरणी प्रवचन कीर्तनातून करीत आहे आपल्या हितासाठी आयुष्य वेचणाऱ्या संतांचा उद्देश अंगीकारणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार माधवराव पाटील जळगावकर हिमायतनगर या

तालुक्यात सिरंजनी येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता प्रसंगी माधवराव पाटील जळगावकर यांनी भेट दिली होती त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ पुष्पहार आणि सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावकरी व बांधवांसह परिसरातील भाविकांची उपस्थिती होती सिरंजनी येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने एक रीतीने अखंड हरिनाम सप्ताह धार्मिक कार्यक्रम होत असतात येथील हनुमान मंदिर सभागृह ला 20 लाख रुपयाचा निधी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी मंजूर केला असून 20अगस्ट रोजी भूमिपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे
