Uncategorized

कोदंरी येथील जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे!जेई या कामाला जबाबदार!


राहुल राठोड यांनी केली गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी:


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागांव: तालुक्यातील मौजा कोदंरी ता.महागांव येथे यवतमाळ जिल्हा परिषद समग्र योजने अंतर्गत कोदंरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या तिन वर्ग रूमाचे बांधकाम करण्यात आले मात्र सदरील बांधकामाची गावातील नागरिकांनी पाहणी केली असता संबंधित बांधकाम अतीशय नित्कृष्ट दर्जाचे करन्यात आल्याचे आढळून आले सदर शाळेचे बांधकाम करतांना गावालगत असलेल्या दुधाळ नाल्यातुन मातीमीश्रीत रेती व त्याच बरोबर कच्च्या विटा पुर्णपणे तयार न झालेल्या व गजा आणि नित्कृष्ट दर्जाचे सिमेंटचे वापर करून बांधकाम करण्यात आल्याने पावसाचे पाणी तिनही वर्ग रुमामध्ये गळत असल्याने विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन केव्हा स्लॅब कोसळुन दुर्घटना होईल याचा काही नेम नाही.सबंधीत बांधकाम ठेकेदार व जेई व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांची मिलीभगत असल्याने सदर शाळेचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे करन्यात आले असून काही निधी हडप करण्यात आल्याचे चित्र समोर दिसुन येत आहे करीता कोदंरी येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल राठोड यांनी काल दिनांक १५ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यवतमाळ सह गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले असून संबंधितावर कार्यवाहीची मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button