Uncategorized

खा हेमंत पाटील दुसऱ्यांदा विकास कामासाठी निवडणूक लढण्यास सज्ज : संतोष जाधव

उमरखेड :
हिंगोली लोकसभा मतदार संघात गतपंचवार्षिक कालावधीत केलेल्या विकास कामाच्या आधारावर खासदार हेमंत पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढण्यास सज्ज झाले असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संतोष जाधव यांनी सांगितले आहे .

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड – महागाव विधानसभेत एकूण 342 बुथ आहेत त्यात 2 लाख 95 हजार 400 मतदार हे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आहेत .हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी सुटला असून शिवसेना शिंदे गट , भाजपा, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांनी संपूर्णपणे ताकदीने खा हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा निवडून देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये शर्तीने काम चालू आहे .त्यात उमरखेड विधानसभेमध्ये 342 बुथ आहेत . प्रत्येक बुथ मध्ये 10 प्रमुख कार्यकर्ते शिवदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत असे एकूण 3420 कार्यकर्ते खासदार हेमंत पाटील यांना विजयी करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे संतोष जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे . व पुढे बोलताना जवळपास उमरखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये निंगणुर पंचायत समिती गण ,कुरळी, दराटी बिटरगाव ,ब्राह्मणगाव, सुकळी, पोफाळी, मुळावा ,बेलखेड तसेच उमरखेड शहराचे सर्व प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, युवासेना , महिला आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी बूथ प्रमुखांसोबत काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि मतदार याद्या वाटप करून प्रत्येक मतदारसंद्यात घरोघरी जाऊन डोर टू डोअर जाऊन मतदारांचे मोबाईल नंबर गोळा करण्याचे काम सुरू केले आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांना प्रशासनाकडून मिळालेल्या नवीन मतदार यादया प्रत्येक बूथ प्रमुखाला दिलेले आहेत ह्या प्रत्येक मतदार याद्या प्रत्येक बूथ प्रमुखापर्यंत पोहोचलेल्या आहेत गेल्यावेळी उमरखेड – महागाव विधानसभेतून खा हेमंत पाटील यांना 50 हजाराची विजयाची लीड मिळाली होती परंतु या वेळेस जवळपास 70 हजाराच्या वर मतांनी लीड खासदार हेमंत पाटील यांना देणार असल्याचे ही संतोष जाधव यांनी सांगितले व पुढे म्हणाले होणारी आगामी लोकसभा निवडणूक ही जनतेसाठी केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी उमरखेड -महागाव तालुका व सर्व मतदार बांधवांनी खासदार हेमंत पाटील यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन संतोष जाधव यांनी केले आहे . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!