Uncategorized

भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण टोल प्लाझा बिजोरा सुरू


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यातून राष्ट्रीय राज्य मार्ग तुळजापूर नागपूर हा रोड झाला आहे .त्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रोड मध्ये गेलेल्या शेत जमिनीला चांगला मोबदला मिळाला आहे .कलगाव ते नांदेड हा रोड उशिरा का होईना पण चांगल्या क्वालिटीचा सिमेंट रोड झाला आहे .महागाव पासून सात किलोमीटर अंतरावर बिजोरा येथे टोल नाका दहा दिवसापूर्वी सुरू झाला .तिथे सर्व सुविधा प्रवाशांसाठी करण्यात येत आहे .तसेच वाहनाचे काही अपघात झाल्यास ॲम्बुलन्स ची सुविधा तसेच अपघाती वाहत उचलण्याकरता क्रेनची सुविधा तसेच इमर्जन्सी सेवा सुविधा उपलब्ध केले आहे.टोल फ्री नंबर 10 33 वर कॉल केल्यास तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या जाईल असे अनिल गंगावणे टोल मॅनेजर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना

सांगितले.वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांना चांगली सेवा दिल्या जाईल त्यांनी सुखात प्रवास करावा आमचे मार्गदर्शक नेहमी 24 तास सदैव सेवेत राहील आमचे सहकार्य करणारे सर्व कर्मचारी 24 तास सेवा देतील तसेच सर्व वाहनधारक जाणार येणाऱ्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध राहील त्यामुळे परिसरातील सर्व अपडेट वेळोवेळी पोलिसांना सहकार्य केले जाईल ,वाहनधारकांनी आम्हाला सहकार्य करावे ,आम्ही त्यांना सहकार्य करू व मार्गदर्शन केले जाईल काही अंतरावर मार्गदर्शक बोर्ड लावले आहेत.तसेच घाटाच्या वर काही अंतरावर सौर ऊर्जेचे कॅमेरे लावली आहेत त्यामुळे त्याचा फायदा परिसरातील सर्व जनतेला अडचणीच्या वेळेस मिळू शकते तसेच घाटामध्ये रोडचे काम प्रगतीपथावर असून टेकड्याचे गोटे पडू नये म्हणून जाळी बसवण्यात आली आहे.त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढी सेवा देता येईल तेवढी दिली जाईल असे मत बोलताना आमच्या प्रतिनिधी जवळ दिले आहे. सध्या टोल नाका रहदारी जास्त नसल्यामुळे रोज एक ते दीड लाख रुपये घाटा सहन करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!