Uncategorized

प्राचीन काळापासून बोलीभाषेने मराठीला जिवंत ठेवले – डॉ विठ्ठल जिवतोडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेडः मराठी भाषेला जगभरात पोहचवून प्राचीन काळपासून तर अभिजात भाषेचा दर्जा मिळे प्रयन्त जिवंत ठेवण्याचे , तिला वाढाविण्याचे काम बोली भाषेने केल्याचे प्रतिपाद गोपिकाबाई गांवडे महाविघालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ . विठ्ठल जिवतोडे यांनी केले ते मिलिंद महाविघालय मुळावा येथे मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित , मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक तथा मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ अनिल काळबांडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख , प्रा ज्योती खंदारे , पाली विभाग प्रमुख प्रा क्रांती मुनेश्वर ह्या होत्या सुरवातीला मान्यवराच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब

आंबेडकर व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पुढे बोलतांना डॉ जिवतोडे म्हणाले , मराठी मुळे आपले आस्तित्व असून विश्वात सर्वात जास्त बोलणारी भाषा म्हणून मराठीचा गौरव आहे . त्यामुळे आपण सर्वांनी जास्तीत जास्त मराठी भाषेचा व्यवहारात शिक्षणात व समाजात वापर केल्यास मराठी भाषा जिंवत राहील अमृतालाही पैजा जिंकण्याचे सामर्थ्य मराठीत आहे . त्यांनी अनेक उदाहरणातून मराठी भाषेचा महिमा सांगीतला . आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ काळबांडे यांनी , मराठीचा महिमा सांगतांना , वारकरी संप्रदायातील सर्व संत ते महानुभव पंथाचे सर्व आचार्य यांनी मराठी भाषेला जिंवत ठेवले नाही तर तीचे स्वरक्षण करून तीला वाढविले ,सांभाळले वेळ प्रसंगी शस्र म्हणूनही वापर केल्याने प्राचीन काळा पासून तर आज गायत ती सर्वच क्षेत्रात पुढे जात असल्याचे प्रतिपादन केले . या पंधरवड्यात भाषण स्पर्धा निबंध स्पर्धा , कथा लेखन ‘ स्पर्धा वक्तृत्व स्पर्ध घेण्यात आली त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी मराठी अभ्यास मंडळाचे प्रज्योत फलटणकर , रुपेश सोळंके , ओमकार शिंदे, लक्ष्मण भवर , अदित्य कांबळे , प्रेम थोरात , खुशी मनवर राणी देवसरकर , सपना वाहुळे , तृप्ती मनवर , अर्पिता देशमुख . स्मृती ठोले सह विद्यार्थ्यांनी सहकाय केले . सुत्रसंचालन मिनाक्षी चव्हाण हीने तर प्रास्ताविक राम तरटे तर आभार रेखा प्लष्कर हिने मानले . (सोबत फोटो डॉ जिवतोडे मार्गदर्शन करतांना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!