Uncategorized

श्रावण बाळ योजनेचा बट्ट्याबोळ सहा महिन्यापासून लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगणे देखील काठी होते. अशा कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्धकाळात औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसतो. त्यांच्या घरातील वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष होते. वृद्धकाळात वृद्ध व्यक्तींकडे कमाईचे साधन नसते, त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यातही त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांना औषधोपचाराचा खर्च आवाक्याचा नसतो. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना समाजात जगणे कठीण होते. त्यांच्याकडे कुठलीही आर्थिक पाठबळ नसते. अशाच वयोवृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी म्हणजेच ६५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या या कुटुंबातील व्यक्तीसाठी श्रावणबाळ योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत नागरिकांना १५०० रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे व गलथान कारभारामुळे श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे यवतमाळ जिल्हा तसेच उमरखेड तालुक्यातील सहा महिन्यापासून मानधन रखडलेले असून त्यामुळे वयोवृद्धांना औषधोपचार व उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. रिपब्लिकन सेनेकडे लाभार्थ्यांनी सदर विषयी न्याय मागितला असता, रिपब्लिकन सेनेच्या वतीने उमरखेडचे तहसीलदार यांच्याकडे येत्या आठ दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रखडलेले मानधन तात्काळ जमा करण्यात यावे अशी आग्रही भूमिका घेत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.


यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, गजानन चिंचोलकर, अनिकेत सूर्य, ताईबाई नवसागरे गोविंद घुगरे, अनुसया सावते, बेबाबाई नवसागरे, सयाबाई नवसागरे, सीमाबाई कदम, धुर्पताबाई नवसागरे, पुण्यरथा नवसागरे, मिलिंद नवसागरे, रुक्मिना नवसागरे, गयाबाई नवसागरे, अनुसया सावते, प्रियंका काळे, बायजाबाई काळे, वंदना भडंगे तसेच तालुक्यातील वंचित लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!