Uncategorizedसामाजिक

भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त गेली ११ वर्षे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येते हे आजच्या युगातील सोशल मिडिया ग्रुप च्या द्वारे मुंबई मधील सेवाभावी संस्था, बचत गट या संत गाडगेबाबा स्वछता अभियान अंतर्गत चैत्याभूमी व शिवाजी पार्क आसपास परिसर स्वछता करून सेवा हिच श्रद्धांजली समजून आपले श्रमदान पार पडतात

सर्व सामाजिक मंडळ, सामाजिक संस्था व बचत गट व सहभागी सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार. या अभियानास विशेष सहकार्य सहाय्यक आयुक्त व घन कचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी वर्ग जी/उत्तर बृहन्मुंबई महानगर पालिका दादर (प) मुंबई-२८. सहभागी संस्था व कार्यकर्ते. यंग बॉईज भिम मंडळ, खार. फ्रेंड्स ग्रुप (आंबेवाडी)

सांताक्रूझ. बाल मित्र मंडळ, नायगाव. धम्मरत्न सामाजिक संस्था (रजि) दादर. समाधान महिला बचत गट. निलेश कदम, मंगेश येवले, यश विलणकर, संतोष शिंदे, ओमकार गुरव, नील कोठारी, संतोष राठोड, साहिल पानगळे. श्री जितेंद्र कांबळे.(उपाध्यक्ष वडाळा विधानसभा) सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!