“जिनिंग अँड प्रेसिग सहकारी संस्थेचे व्यापार संकुला चे नामकरण प्रकरणाची याचिका मा. सहकार न्यालयातून माघार”

भाऊसाहेब माने नामकरण संगर्ष समिती, उमरखेड, चा निर्णय.
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्था र. न. 104 या सहकारी संस्थेच्या चे पुसद रोड वर बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलनाला, संस्थेच्या सभासदांनी व विविध सामाजिक संघटनानी या संकुलनाला संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष लोकनेते माजी आमदार भाऊसाहेब माने यांचे नाव देण्या संबंधित जाहीर मागणी केली असताना तत्कालीन संचालक मंडळांनी कोरोनाचे काळात सभेचा कोरम पूर्ण न करता ऑनलाईन आमसभा घेऊन त्या संकुलनाला लोकनेते स्वर्गीय अनंतराव देवसरकर यांचे नाव देण्याची कार्यवाही करण्यात आली होती.
यासंदर्भात सहकारमहर्षी भाऊसाहेब माने नामकरण संघर्ष कृती समितीचे सर्व सदस्य यांच्या मार्फत हे बेकायदेशीर नामांतर केल्यामुळे न्याय मिळण्यासाठी सहकार न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर जून 2023 ला या संस्थामध्ये निवडणुका होऊन सत्तापालट झाल्या नंतर, भाऊसाहेब माने संगर्ष समिती चे सचिव श्री विलास चव्हाण आणि श्री उमाकांत मडके यांच्या सुचणे वरून उमरखेड तालुका जिनिंग आणि प्रेसिंग संस्थेस संस्थेचे तत्कालीन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब माने यांचे नाव देण्यास सूचित केले होते त्या अनुषंगाने या निर्णयास सत्यशोधक शेतकरी संघाच्या नेते मंडळींनी सहमती देऊन स्व. जेठमलजी महेश्वरी यांचे नातू व संस्थेचे सभासद श्री नितीन महेश्वरी यांनी संस्थेच्या २०२३ वर्षी च्या आमसभेमध्ये नामकरण प्रस्ताव मांडला होता. सदरील प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देऊन रीतसर कार्यवाही करण्याचा ठराव झाला होता. तदनंतर संस्थेच्या सभासदांनी आणि नवीन संचालक मंडळानी उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग या संस्थेला सहकारमहर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग संस्था हे नाव देण्याची कार्यवाही झाल्या नंतर संस्थेच्या सन २०२४ ला संपन्न झालेल्या आमसभेत संस्थेच्या नावात नामविस्तार करून भाऊसाहेब माने यांचे नाव दिल्यामुळे व संगर्ष समिती चे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे संगर्ष समितीचे अध्यक्ष श्री श्रीधर देवसरकर व श्री विलासराव चव्हाण यांनी, व्यापारी संकुलणनाला स्व. अनंतराव देवसरकर हे नाव दिल्याचे प्रकरना च्या विरोधात सहकार न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेन्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली होती. या संदर्भात भाऊसाहेब माने नामकरण संगर्ष समिती ची बैठक संपन्न होऊन या सभेमध्ये स्व. अनंतराव देवसरकर व्यापार संकुल नामकरण विरोधात सहकार न्यायालयात दाखल असलेली याचिका माघे घेण्या संधर्भात प्रस्ताव मांडला असता हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाल्यामुळे या प्रकरणात दाखल याचिका माघे घेण्या संदर्भात मा. सहकार न्यालयाची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्या संबंधी निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात संस्थेच्या सर्व सभासदांनी भाऊसाहेब माने नामकरण संगर्ष समिती व संस्थेच्या नवीन संचालक मंडळाचे तसेच सत्य शोधक शेतकरी संघाच्या नेते मंडळीचे सदरील प्रकरणामध्ये सर्व समावेशक निर्णय घेऊन योग्य न्याय केल्या बदल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.