Uncategorized

690 लोकांना जीवदान देणारा ‘बंग्या’ जामनेर येथे सन्मानित

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

येथील किशोर महाराज म्हणून प्रचलित असलेले “बंग्या, उर्फ किशोर तिवारी मागील 2007 पासून शहरातील आत्तापर्यंत 690 लोकांना व्यसनमुक्त करून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जीवनदान देण्याचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जामनेर येथील संकल्प व्यसनमुक्ती केंद्र येथे संस्थेचे अध्यक्ष शालिनीताई सोनार यांच्या वतीने 2 जानेवारी रोजी सन्मानित करण्यात आले.

शहरातील गोचरस्वामी टिळक वार्ड चौबारा चौक येथील रहिवासी किशोर तिवारी महाराज ज्यांनी मागील अनेक वर्षापासून समाजसेवा हीच ईश्वर सेवा असा वसा साकारल्याने तालुक्यातील अनेक व्यसनाधीन झालेले नागरिकांना जामनेर जि. जळगाव येथे स्वखर्चाने घेऊन जाऊन त्यांचा उपचार करून जीवनदान देण्याचे सत्कर्म करत आत्तापर्यंत 690 नागरिकांना व्यसनमुक्त करून त्यांच्या कुटुंबाचा आशीर्वाद घेत सामाजिक भूमिका साकारत आहेत. याकरिता जामनेर जिल्हा जळगाव येथे संकल्प व्यसनमुक्ती केंद्र यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शालिनीताई सोनार व न

पा बांधकाम सभापती वानखेडे

यांच्या प्रमुख उपस्थितीत

किशोर तिवारी यांना उत्कृष्ट

समाज सेवक म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

किशोर उर्फ बंग्या या हरपणमौला मानवाला कुठलाही राजकीय वसा नसून फक्त मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे ध्येय बाळगणारे किशोर आपल्या टिळकवार्ड चौबारा चौक या परिसरात मागील अनेक वर्षापासून अनेकांच्या सुखदुःखात धावून जातात त्यामुळे त्या परिसरातील लोक त्यांना बंग्या या नावाने ओळखले जातात. संकल्प व्यसनमुक्ती केंद्राने सन्मानित केल्याबद्दल बंग्या यांचा सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!