Uncategorized
महागावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव येथील पंचायत समितीच्या प्रांगणात एका ३० वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतकाचे नाव राजू गुणाजी भिसे (वय ३०, रा. महागाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला.
फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. सदर जबानी रिपोर्टवरून महागाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली असून पुढील तपास आंबुरे प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



