Uncategorized
करोडीरोड परिसरातील 53 युवकांचा कॉग्रेस प्रवेश

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
विधानसभेत सध्या युवकांचा कॉग्रेसकडे झुकाव वाढला असून, ग्रामीण भागासह शहरी भागातील युवकांचा प्रवेश घेण्याचा सपाटा वाढला आहे. शहरातील करोडीरोड भागातील 53 युवकांनी युवा नेते गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली काल 1 ऑक्टोबरच्या, रात्री 7 च्या दरम्यान प्रवेश घेण्यात आला.
मागील महिन्याभरापासून उमरखेड विधानसभेतील ग्रामीण भागात राहणाऱ्या हजारो युवकांची, काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याची रीघ सुरु आहे. यातच काल पुन्हा एकदा शहर भागातील करोडीरोड परिसरातील 53 युवकांनी, युवा नेते गोपाल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश घेतला. बाळु खरुसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रवेशासाच्या कार्यक्रमात, प्रवेश घेणाऱ्या युवकांनी मागील काही वर्षापासून सुरु असलेली ससेहोलपट व विकासाच्या नावावर होत असलेली फसवणुकी बाबत उघडपणे बोलून दाखविले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन, माजी नगरसेवक बालुअण्णा दुर्गमवार, बालाजी गायकवाड, सिध्देश्वर जगताप, भय्या पवार, समद पठाण यादगार, इश्वर गोस्वामी, सुरेश जाधव, बंटी मंत्री, शंकर ठमके, प्रकाश वानखेडे, तवकीर शेख, विरेंद्र खंदारे, गणेश रावते, दर्शन भंडारी, किरण साखरे अदि उपस्थित होते.