Uncategorized

थेरडी ( वन ) ता . उमरखेड येथे बहूजन मुक्ती पार्टी समर्थीत अपक्ष उमेदवार इंजि. विद्वान केवटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ .

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306292


दि. ७ । ११ । २०२४ रोजी थेरडी ( वन ) या उमरखेड मतदार संघाच्या शेवटच्या अतिदुर्गम भागातील गावात संत फुलाजी बाबा ध्यान केंद्र मैदानात बहुजन मुक्ती पार्टी समर्थीत अपक्ष उमेदवार इंजि. विद्वान केवटे यांनी आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला .
विधानसभेस उभा असणारा उमेदवार दुर्गम , दुर्लक्षीत भागात जाऊन प्रचार शुभारंभ करतो ही आगळी वेगळी बाब

बंदीभागातीलच नव्हे तर मतदार संघातील नागरीकांना अश्चर्याचकित करणारी व नागरीकांच्या समस्याप्रती आपुलकीची वाटत आहे .
प्रचार सभेसाठी वर्षाताई शिवाजीराव देवसरकर बहुजन मुक्ती पार्टी हिंगोली लोकसभा प्रभारी , चक्रधर पाटील देवसरकर उमरखेड महागांव विधानसभा प्रभारी , मिलिंद चिकाटे बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क ता. अध्यक्ष , शे. जब्बार भाई राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा , पुंजाराम हटकरे राष्ट्रीय किसान मोर्चा , डॉ. सुरज मोरे आदिवासी एकता परिषद , स्थानिक सरपंच , बंदीभागातील गाडी , बोरी , थेरडी , चिखली , परोटी , मोरचंडी , सोनदाभी , जेवली , लिंगी , मुरली इ . गावातील जेष्ठ

नागरीक , महिला , तरूण , शेतकरी , मजुर तसेच उमरखेड महागाव तालुक्यातील २० समविचारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्टँप पेपरवर जाहीरनामा लिहून देणारी बहुजन मुक्ती पार्टी ही देशातील एकमेव पार्टी असल्याने ह्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे अवाहन वर्षाताई देवसरकर यांनी मतदारांना केले .
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा संविधानाला अभिप्रेत मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत विकास झाला नसून नागरीकांचे मुलभुत हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी छत्र पती शिवरायांनी जसे आठरा पगड जातींना एकत्र करून बहुजनांचे,
शेतकरी कष्टकऱ्यांचे , रयतेचे राज्य निर्माण केले.त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन , शाहू , फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , बिरसा मुंडा इं . महामानवांच्या विचारधारेवर काम करून आरक्षणासह वंचित घटकांचा आवाज विधानसभेत बुलंद करण्यासाठी उच्चशिक्षीत उमेदवार इंजि.विद्वान केवटे, यांच्या खाट निशानी वर शिक्का मारून विजयी करण्याचे नम्र अवाहन चक्रधर पाटील देवसरकर यांनी मतदारांना केले .
विद्वान केवटे यांनी,५०० रु स्टॅम्प पेपर वर मतदार संघातील समस्यांचा जाहीरनामा लिहून दिला आहे.


“मला आमदार केल्यास मतदार संघातील अनेक समस्या सोडविण्याची सुरुवात बंदीभागापासून करणार तसेच आरक्षण , शेती , शिक्षण , आरोग्य , उद्योग , रोजगार , पाणी विज , खड्डे मुक्त रस्ते इ . समस्यावर विधान सभेत आवाज उठवू अशी ग्वाही बहुजन मुक्ती पार्टी समर्थीत अपक्ष उमेदवार इंजि. विद्वान केवटे यांनी मतदारांना देवून मला विधान सभेत प्रचंड बहुमताने विजयी करा,” अशी विनंती केली .
यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे सुरज मोरे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे शेख जब्बार भाई , बिन चे मिलींद चिकाटे,राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघाचे इंदल राठोड,छत्रपती क्रांती सेनेचे सुनील शिंदे इ . यांनी २० सामाजिक संघटनां चा पाठींबा दर्शवून विद्वान केवटे यांना निवडून आणण्याचा तन, मन,धनाने प्रयत्न करणार असे सांगितले .


उपस्थित नागरीकांनी विद्वान भाऊ को वोट भी देंगे ! नोट भी देंगे ! असे नारे देऊन आर्थिक सहाय्य सुद्धा केले हे विशेष . गावात प्रचार फेरी काढून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी थेरडी ,बंदी भागवासीयांनी तन , मन ., धनाने परिश्रम घेतले कायम दुर्लक्षित असलेल्या बंदी भागातून प्रचाराचा नारळ फोडणारे एकमेव उमेदवार म्हणून बंदी भागात या कार्यक्रमाची विशेष चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!