Uncategorized

राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांची झाली चाळणी, जागोजागी खड्डे !

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : उमरखेड-पुसद

राज्यमागीची मागील पाच-सहा वर्षापासुन दैना झाली आहे. नागरीकांनी वारंवार निवेदन देऊन कोणीही दखल घेतली नाही. हा रस्ता आहे की पांदण रस्ता आहे कळायला मार्ग नाही. शासन रस्ते दुरुस्तीसाठी करोडो रुपये निधी मंजूर करते पण रस्त्यांचा विकास मात्र अदयापही झाला नसल्याने रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

रस्त्यांनी ये -जा करणारे नागरीक वाहनधारक यांना नाहक त्रास तर होत आहे त्यांना रस्त्यावर जे खड्डे पडले त्या खड्‌यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. उमरखेड – पुसद रस्त्यावर पोफाळी कुपटी मरसुळ दहागाव या गावाच्या लगत जो राष्ट्रीय मार्ग रस्ता जात आहे या रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले रस्ता संपूर्ण उखळला गिटी बाहेर निघाली डांबर गायब झाले या रस्त्यावर गिटी उखळल्याने रस्त्यांची वाट लागली मागील पाच वर्षे झाले तरी रस्ता दुरुस्ती झाला नाही राज्यात व केंद्रात महायुतीची रस्ता आहे तर विद्यमान लोकप्रतिनिधी नी रस्त्यांच्या विकास कामासाठी तात्काळ पाठपुरावा करून रस्ता दुरुस्तीचे कामे करावे अशी जनतेची मागणी आहे. उमरखेड पूसद हा रस्ता आहे की पांधण रस्ता आहे ते कोणाला ही कळायला मार्ग नाही.या रस्त्यांनी नागपूर – तुळजापूर वाहने धावतात वाहनधारक त्रस्त झाले रस्त्यावर वाढते अपघाताचे प्रमाण वाढले तरी शासन दुर्लक्ष करीत रस्ता दुरुस्तीचा मुहूर्तमेढ केव्हा होणार याकडेसवींचे लक्ष लागले आहे. रस्ता उखळल्यामुळे धुळीचे प्रमाणामुळेनाहक प्रवाशांना व वाहन चालकांना त्रास सोसावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!