Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

काँग्रेसच्या वतीने हिमायतनगरच्या मा. तहसीलदार मॅडमना निवेदन; ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी
शासनाचा हा कारभार पाहून प्रश्न पडतो—सरकार खरंच शेतकाऱ्यांकडे पाहणार आहे की ‘जय जवान, जय किसान’चा नारा फक्त कागदावरच राहणार?

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

हिमायतनगर (ता़ प्रतिनिधी शेख खय्यूम):
तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गजानन दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात, नगरसेवक, नगरसेविका प्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मा. तहसीलदार मॅडम (तहसील कार्यालय, हिमायतनगर) यांना तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले।
गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील सोयाबीन, कापूस, ऊस, मूग आणि उडीद ही सर्व पिके जळून खाक झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे।
निवेदनातील प्रमुख मागण्या:
कोरडा दुष्काळ जाहीर करा: हिमायतनगर तालुका विनाअट तात्काळ ‘कोरडा दुष्काळग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात यावा।
हेक्टरी १.२५ लाखांची मदत: पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी बळीराजाला तात्काळ हेक्टरी १.२५ लाख रुपयांची मदत द्यावी।
थकीत विमा व नवीन कर्ज: सर्व पिकांचा थकीत पीक विमा त्वरित मंजूर करून रब्बी हंगामासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे।
शुल्क व कागदपत्र माफी: कर्जासाठी लागणारे बँकेचे बेबाकी प्रमाणपत्र, टोच नकाशा व फेरफार नक्कल फी पूर्णपणे माफ करावी।
चारा छावण्या व मोफत बियाणे: जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात आणि रब्बी हंगामासाठी मोफत बी-बियाणे व खतांचा पुरवठा करावा।
“शासनाने या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा संपूर्ण हिमायतनगर तालुका रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल,” असा इशारा यावेळी उपस्थित पदाधिकारी व शेतकऱ्यांनी दिला आहे।

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button