मुडाणा ग्राम पंचायत उपसरपंच पदी सौ.सुनीता वानखेडे यांची निवड.

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
मुडाणा ग्राम पंचायत च्या उपसरपंचपदी सौ.सुनीता अशोकराव वानखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली.
महागाव तालुक्यातील मुडाणा ग्राम पंचायत चे उपसरपंच रमेश जाधव यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते.
उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आज ग्राम पंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सौ.सुनीता अशोकराव वानखेडे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच वैभव बरडे, ग्रा.पं.सदस्य अंबादास पाटिल, वसंत राठोड़ ,आत्माराम इंगळे, रमेश जाधव ,ज्ञानेश्वर हेलगड ,प्रकाश उचेगावकर ,शोभाताई आत्माराम माटालकर ,ईश्वरी रवी डहाळे ,लक्ष्मीबाई दिलीप खराटे ,कल्पनाताई रनमले यांच्यसह ,आत्माराम माटालकर ,संदिप खराटे ,राहुल वानखेडे, विशाल घुमनर ,विजय बरडे, ज्ञानेश्वर पानपट्टे,अतुल येनकर, रवि डहाळे गजानन येनकर व गावकरी उपस्थित होते.
यावेळी निवडणुक अध्यासी अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी राम पंडित यांनी तर सह अध्यासी अधिकारी म्हणुन ग्राम महसुल अधिकारी बोक्से मॅडम,ग्रामसेवक माने यांनी कामकाज पहिले.