Uncategorized

महागाव तालुक्यात गुंज सवना साखर कारखाना नॅशनल शुगरचा शेतकऱ्यांना उसाचा भाव 2800 प्रति टन अंतिम ऊस दर जाहीर . कुषीरत्न बी.बी.ठोंबरे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी जाहीर केले.


तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे

आज दिनांक 28 रोजी नॅशनल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिट युनिट 2 गुंज सवना या साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात 5,32,697 मे टन विदर्भात उच्चांकी उसाचे गाळप केले आहे.
नॅशनल शुगरला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी विदर्भात सर्वाधिक ऊस दर देणार असल्याचे कृषीरत्न श्री बी .बी .ठोंबरे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी जाहीर केल्याप्रमाणे गेल्या गळीत हंगामात नॅशनल शुगरला उस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता 2.500 प्रति टना प्रमाणे यापूर्वीच अदा केला असून सालाबादप्रमाणे ऊस बिलाचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांना पेरणी व ऊस मशागतीसाठी रुपये 300 प्रति टनाने देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे मागील गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाला एकूण रुपये 2800 टनाप्रमाणे रक्कम रुपये 16 कोटीचे धनादेश शेतकऱ्यांना विभाग वाईज दिनांक 1 जून 2025 पासून कारखान्याने शेती गट कार्यालयामार्फत वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केली आहे. नॅचरल शुगरने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सदैव जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा व शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे तसेच नॅचरल शुगरने सदैव विदर्भामध्ये जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा पायंडा कायम ठेवला आहे तसेच मागील गळीत हंगामात ऊस तोडणी व वाहतुकीचे कमिशन व डिपॉझिट रक्कम 10 कोटी सर्व कंट्रकदारांना नुकतेच वाटप करण्यात आले असून पुढील गळीत हंगामासाठी ऊस तोडणी वाहतुकीचे कराराचा शुभारंभ सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी आपल्या नॅशनल शुगर कडे ऊस नोंदणी करून सहकार्य करावे अशी आवाहन कृषी रत्न श्री बी.बी .ठोंबरे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी यावेळेस केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!