अभियंता ते उपविभागीय अभियंता प्रवास एकाच विभागात वर्षानुवर्ष ; जुन्या सर्व तक्रारी प्रलंबित : टक्केवारीमुळे कामातील दर्जा घसरला

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
शासनाने अवास्तव निविदा प्रसिद्ध करून कार्यारंभ आदेशावरच कमिशन घेतले त्यातच दहा टक्के निधीतून कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली. कामावरील झालेला खर्च प्रत्यक्षात हाती आलेले बिल पाहता संबंधित कंत्राटदाराच्या अंगावर व्याजाचा डोंगर वाढतच गेला आहे. अश्या दुष्चक्रात कंत्राटदार सापडलेला असताना वाढीव टक्केवारीमुळे कामातील दर्जा अतिशय घसरलेला आहे. वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेले अभियंते शासन आणि नागरिकाची अक्षरशा दिशाभूल करू लागले आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी अपेक्षा कंत्राटदार व नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
शाखा अभियंता ते उपविभागीय अभियंता असा प्रवास महागाव ,उमरखेड सर्वाधिक कार्यकाळ घालवणारे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता प्रमोद यांच्या कार्यकाळातील सर्व तक्रारी ते स्वतः उमरखेड येथे उपविभागीय अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर प्रभावित झालेल्या आहेत. महागाव येथे कार्यरत असताना महागाव ते फुलसावंगी या रस्त्यावर हॉट मिक्स न करता ९६ लाख रुपयाचे बिल काढण्यात आले होते. याची भनक लागतात तत्कालीन अधीक्षक अभियंता लष्करे यांनी महागाव येथे तात्काळ भेट देऊन चौकशी केली असता संबंधित अभियंत्याने या रस्त्यावर रातोरात हॉट मिक्स करून घेतले होते. असा पूर्व इतिहास असलेला उपअभियंता पालकमंत्र्याची डोकेदुखी नको म्हणून दारव्हा येथून उमरखेड येथे उपअभियंता म्हणून बदलून आलेला आहे. या अधिकाऱ्याच्या अंतर्गत असलेल्या उपविभागात खास करून बंदी भागात बरीच कागदोपत्री काम दर्जाहीन पद्धतीने सुरू आहे. तक्रारीची दखल होत नसल्यामुळे चांगले रस्ते नागरिकाचा अधिकार असूनही महागाव उमरखेड परिसरातील नागरिक खराब रस्त्याचा अनुभव घेत आहेत.
झालेला कामाचे देयक मिळवण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून कंत्राटदार संघटना महाराष्ट्र भर आंदोलन धरणे उपोषण करून शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन निधीची मागणी करत आहे. परिसरातील कंत्राटदार आर्थिक विवंचनेत असताना हेच अधिकारी या कंत्राटदाराची देयक काढून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत. एकीकडे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडलेले असताना उमरखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागामध्ये विकास कामातून भ्रष्टाचाराची नवीन वाट शोधण्यात आली आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या उपअभियंता प्रमोद यांनी सुरुवातीला सरळ सरळ कामाचे देयक बनवणे नंतर योग्य ते समजावून सांगितल्यानंतर त्यावर किती मलिदा काढायचा हे ठरल्यानंतर ओरिजनल मोजमाप पुस्तिकेत लिहायचे कामातील ऍडजेसमेंट करिता माणूस ठेवायचा असा भ्रष्टाचाराचा वेगळा फंडा अवलंबण्यात आल्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये होत आहे काही नेत्याच्या दबावामुळे विशिष्ट कामाच्या दर्जावर दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने बिल काढायची हा नवीनच फंडा अमलात आणल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उमरखेड महागाव उपविभागातील खास करून सुरू असलेल्या व झालेल्या विकास कामाची तात्काळ पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत सुधारणा करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे .