शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या हस्ते विठ्ठलराव व बाळासाहेब वानखेडेचा सत्कार केला.

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
दि. 23 जानेवारी 2025 रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता जिजाऊ भवन उमरखेड येथे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचा संवाददौरा कार्यक्रम आयोजित होता. याप्रसंगी एका खेडेगावातील हर्षद जाधव हा विद्यार्थी गेल्या दोन वर्षापासून एमबीबीएसच्या ऍडमिशन साठी प्रयत्नशील होता. पण गतवर्षी सेमी गव्हर्मेंटला नंबर लागला होता पण पैसे अभावी प्रवेश घेतला नाही. परत त्याने यावर्षी प्रयत्न केले पण सर्व प्रयत्न शिकवणीशिवाय होते. हे विशेष तथा उल्लेखनीय बाब आहे. पण प्रयत्नशील विद्यार्थी असल्यामुळे तो नीट परीक्षेत पास झाला.परंतु फीस साठी जुळवा जुळव होत नव्हती जवळ एक रुपया नव्हता अशा परिस्थितीत या सामान्य पण कर्तृत्ववान विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थ्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे विठ्ठलराव वानखेडे व बाळासाहेब वानखेडे साखरा उमरखेड यांनी काही विद्यार्थीप्रेमी व्यक्ती मध्ये नितीनजी भुतडा जिल्हा समन्वयक भाजपा उमरखेड नामदेवराव ससाने माजी आमदार उमरखेड व एडवोकेट किशोर पाटील साहेब जळगाव यांनी साडेपाच लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य केले.व आठ दिवस सतत जळगाव मुंबई छत्रपती संभाजीनगर येथे राहून एमबीबीएस साठी प्रवेश मिळवून दिला.
पण काही गोष्टी पैसे असूनही होत नव्हत्या कॉलेज प्रवेश करायला तयार नव्हते त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांनी ऍडमिशन होत नाही. असा स्पष्ट नकार दिला त्यावेळेस सर्वजण हातबल झाले.आता यावर काय पर्याय सुचवावा तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन हायकोर्टात धाव घेतली.तेथील वकील लोकांनी सहकार्य करून तत्वतः केस दाखल करून घेतली आणि अवघ्या दोन दिवसांमध्ये हर्षद जाधव या विद्यार्थ्यांची आपण ऍडमिशन करावी असा आदेश कॉलेज ला दिला. आणि त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. सर्वांनी सहकार्य केल्यामुळे एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या दोन व्यक्ती जणू काही हर्षद जाधव साठी देवदूतच बनल्या असे म्हणायला हरकत नाही.
समाजासाठी झटणाऱ्या कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीचा संविधान प्रत देऊन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी त्यांचा सन्मान केला व अशाच प्रकारचे सहकार्य आपण भविष्यातही करावे असा त्यांनी संदेश दिला.