Uncategorized

चातारी येथे एकास बेदम मारहाण एका आरोपी सह तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड : शेतातील स्प्रिंकलरचे पाईप तोडल्याच्या संशयावरून चातारी येथील गावातीलच चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण केल्याची घटना १५ मार्च रोजी ७:३० वाजताचे दरम्यान घडली. गजानन चंदू कानकाटे (४०) रा. चातारी असे जखमीचे नाव आहे. गावातीलच आरोपी शुभम शिवाजी हामंद रा. चातारी व अन्य अनोळखी तिघेजण असून जखमी इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.१५ मार्च रोजी फिर्यादी गजानन कानकाटे व त्याची पत्नी त्यांच्या चातारी शिवारातील शेताकडे काम करण्याकरिता
जात असताना चातारी येथीलच शुभम हामंद व अन्य अनोळखी तिघेजण यांनी वाटेत आडवून आमच्या शेतातील स्प्रिंकलरचे पाईप तू तोडल्याचा आम्हाला संशय आहे. असे म्हणून आरोपी शुभमने हातातील काठीने मारहाण केली व अन्य अनोळखी तिघांनी लाथा बुक्क्यांनी पती-पत्नींना मारहाण केली. वरील चौघांनी पती-पत्नींना जीवाने मारून टाकतो, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!