Uncategorized

आरोग्य व आर्थिक समृध्दी करीता अभियान आवश्यक आमदार –  किसनराव वानखेडे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड :- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत “कंपोस्ट खडा भरून, आपले गांव स्वच्छ ठेऊ” हे अभियान दिनांक 01 मे ते 30 स्पटेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

01 में महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायत ब्राह्मणगांव पंचायत समिती उमरखेड येथे किसनराव वानखेडे आमदार विधानसभा क्षेत्र उमरखेड यांचे हस्ते फित कापुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रकाश नाटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जि.प. यवतमाळ यांनी आपल्या मनोगतामध्ये ग्रामीण भागात गावांना दृष्यमान स्वच्छतेचा दर्जा मिळुन ग्रामीण जनतेत स्वच्छता विषयक वर्तणुकीत बदल घडवुन आणणे हा उददेश आहे. असे नमुद करून या अनुषंगाने गावामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे विविध आजाराची व जीवणुची निर्मिती होत असुन विविध प्रकारचे आजार होतात.

या आजारापासुन कायम स्वरूपी सुटका होण्याकरीता गावातील सार्वजनिक कचरा जमा करून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या कंपोष्ट खडयामध्ये साठवुन शात्रीय पध्दतीने उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करता येईल असे सांगीतले. शेतकऱ्यांनी घरातील कचरा उघडयावर न टाकता कंपोस्ट खडयामध्ये साठवुन उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करावे. यामुळे जमिनीचा पोत सुधारून पिकाचे उत्पन वाढीकरीता मदत होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कंपोस्ट खडयाकरीता रक्कम रूपये 16000/- अनुदान उपलब्ध होणार आहे. याचा सुध्दा लाभ ग्रामपंचायती संपर्क साधुन घ्यावा. असे आव्हान केले.

आमदार किसनराव वानखेडे  यांनी आपल्या मनोगतामध्ये कचरा साचल्यामुळे विविध आजाराचे जिवाणु विषाणु तयार होउन विविध घातक आजार होऊ शकतात. यावर नियंत्रण करण्याकरीता कंपोस्ट खडा हा प्रभावी उपाय असल्याचे सांगुन हे अभियान लोकहिताचे असल्याने प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव वानखेडे ,  नितीन भुतडा , प्रकाश नाटकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, परमात्मा पांडुरंग गरुडे सरपंच, गटविकास अधिकारी किरण कोळपे, अमोल चव्हाण विस्तार अधिकारी, प्रकाश मानसिंग राठोड ग्रामपंचायत अधिकारी, मा.जि.प.सदस्य संदीप हिंगमिरे, ग्रा.प.सदस्य पुनाजी देशमुख जिल्हास्तरीय समन्वयक,  कैलास वाहुळे, गणेश आडाणे मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!