Uncategorized

युनिव्हर्सल इंग्लिश मेडीयम बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित…

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड ;- महाराष्ट्रातील १८,००० शाळा सदस्य असलेल्या मेस्टा (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोशिएशन) या संघटनेचे नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशन डॉ. काशिनाथ घानेकर सभागृह, ठाणे-मुंबई येथे पार पडले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील, मेस्टाचे राज्याचे अध्यक्ष डॉ. प्राध्यापक नामदेवराव दळवी, विदर्भ अध्यक्ष श्री. किरण चौधरी, विधान परिषदेचे शिक्षक आमदार श्री. ज्ञानेश्वरजी म्हात्रे, आमदार श्री. संजय केळकर व माजी आमदार श्री. निरंजन डावखरे तसेच व्हि.सी.एस. च्या विश्वस्त विमल सोमन आणि संस्थेचे अनेक पदाधिकारी या अधिवेशनाकरीता प्रामुख्याने उपस्थित होते.
उमरखेड येथील युनिव्हर्सल इंग्लिश मेडीयम स्कूलला या कार्यक्रमात बेस्ट स्कूल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युनिव्हर्सल इंग्लिश मेडीयम स्कूलच्या वतीने हा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्री. संजय परमानंद माहेश्वरी व वि. अध्यक्ष अॅड. संतोष जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला. त्याच प्रमाणे याच शाळेतील जेष्ठ शिक्षीका सिंधू ग्रेस जॉनसन यांना इंग्लिश विषयाच्या उत्कृष्ठ शिक्षीका म्हणून तर श्री. रमेश वाघमारे यांना गणित आणि श्री. विकास खांडेकर यांना उत्कृष्ठ क्रिडा व आरोग्य या विषयांमध्ये भरीव कार्य केल्याबद्दल तर श्री. अश्वजीत मानकर यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल बेस्ट टिचर पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी श्री. अविनाश शिंगणकर व श्री. यादव लाखकर हे पुरस्कार वितरणाचे वेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे वि. अध्यक्ष अॅड. संतोष जैन यांनी या पुरस्काराचे संपुर्ण श्रेय संस्थापक अध्यक्ष श्री. संजय माहेश्वरी, उपाध्यक्ष श्री. कमल माहेश्वरी, सचिव श्री. संतोष माहेश्वरी, माजी आमदार श्री. प्रकाश देवसरकर, माजी नगराध्यक्ष श्री. चंद्रशेखर जयस्वाल, संस्थेचे माजी सचिव श्री. भगवान अग्रवाल, माजी सचिव श्री. सुशिल सोनी, माजी कोषाध्यक्ष श्री. ओमप्रकाश भागवत व सहसचिव श्री. राजकुमार माहेश्वरी व इतर विश्वस्त तसेच संस्थेतील मुख्याध्यापिका सौ. मनिषा फुलेवार व सौ. विजया ठाकरे आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विश्वस्त यांनी शाळेसाठी वेळोवेळी घेतलेले अथक परिश्रम, पालक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला विश्वास व शिक्षणाचा टिकवून ठेवलेला दर्जा व शिस्त यामुळे हा गौरव प्राप्त झाल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!