संस्कार पोदार लर्न स्कूल उमरखेड येथे राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

एस पी दळवी (ता. प्र.)
उमरखेड
दिनांक २२/१२/२०२५
भारताचे महान गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्य स्थानिक संस्कार पोदार लर्न स्कूल मध्ये शैक्षणिक वातावरणात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
गणित या विषयाची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणारे मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध

असलेले तुषार सेता(जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसद) हे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले तर प्रमुख पाहुणे अजय क्षीरसागर हे होते. महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणित गीत, गणित कविता वाचन, स्कीट गणितावर आधारित नृत्य सादर करण्यास वर्ग २ते ९ वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध गणितीय संकल्पना मांडून गणितातील सौंदर्य व उपयुक्तता गणितीय मॉडेल व प्रकल्पाचे आकर्षक प्रदर्शनातून प्रभावीपणे सादर केले हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शब्दातून गणित हा विषय जीवनाशी

निगडित असल्याचे प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन मेघा दिघेवार तर आभार प्रदर्शन कृष्णा गोरे यांनी केले. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता संचालक मंडळाचे मार्गदर्शनाखाली, प्रिन्सिपल, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.



