Uncategorized
महागांव प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग कार्यालयास आमदारांची आकस्मित भेट! महागाव तहसीलप्रमुख मस्केंची आमदार भेटी दरम्यान दांडी

महागांव प्रतिनिधी, संजय नागरगोजे
वृत्तपत्रांच्या बातम्यांची दखल घेत उमरखेड -महागाव विधानसभेचे आ. किसनराव वानखेडे यांनी महागांव येथील प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागांना आकस्मीत भेट देत पाहणी केली. दरम्यान महागाव तहसीलचे प्रमुखच अनुपस्थित असल्याने आमदाराचा पारा चांगलाच भडकला होता.
22 मे 2025 रोजी महागाव येथील प्रशासकीय इमारती मधील विविध विभागांच्या कार्यालयांना विभागाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी अकस्मीत भेट दिली. भेटी दरम्यान कार्यालय प्रमुख स्वतःच गैरहजर आढळले. तर कार्यालयात सव्वा अकराच्या दरम्यान केवळ 14 कर्मचारी उपस्थीत होते. दैनंदिन हजेरी पटावर चौकशी दरम्यान बाकी कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याने त्यांचा अहवाल वरिष्ठाकडे पाठवण्यात येणार असल्याचे कळते. जनतेची कामे वेळेवर व्हावीत, त्यांना कामासाठी त्रास होऊ नये, हा या भेटीचा उद्देश होता. तहसील कर्मचाऱ्यांना पाहुणे दहा वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असतांना सव्वा अकरा वाजेपर्यंत संपूर्ण कार्यालयाची जबाबदारी असणारे कार्यालय प्रमुख अभय मस्के तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी आणि अनेक कर्मचारी अनुपस्थीत असल्याने आमदाराचा पारा चांगलाच भडकला होता. आमदारांनी 22 मे रोजी महागाव येथील प्रशासकीय इमारती मधील कृषी अधिकारी कार्यालय, लघुपाटबंधारे विभाग कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सहकार क्षेत्र कार्यालया सोबत बाल विकास प्रकल्प कार्यालय अशा विविध कार्यालयाला भेटी दिल्या. या पाहणी दौऱ्यात कोणीही कर्मचारी कामात व्यस्त नसल्याचे आमदारांच्या निदर्शनात आले. यापूर्वी सुद्धा भेट दिली, वारंवार सूचना दिल्या. महागाव तालुक्यातील जनतेच्या वारंवार तक्रारी असतात. परंतु या ठिकाणी कोणत्याही तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेतल्या जात नाही. येणाऱ्या काळात कार्यवाही झाली तर कर्मचारी स्वतः जबाबदार राहतील असा या वेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी गर्भित इशारा दिला. या ठिकाणी चालू असलेले कामकाज अतिशय चुकीच्या पद्धतीचे असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. गाव खेड्यातून येणाऱ्या सामान्य जनतेचे कामे वेळेवर होत नाहीत. महागाव तहसीलचे कर्मचारी बारा वाजेपर्यंत कार्यालयात येत नाहीत. ही स्थीती महागाव प्रशासकीय इमारती मधील सर्वच कार्यालयाची आढळली. तहसीलदार अभय मस्के यांना यापूर्वी सुचना दिली होती, परंतु त्यांच्याच काहीच फरक पडत नसल्याने आमदार महोदयांनी म्हटले आहे, याबाबत वरिष्ठांकडे अहवाल सादर होणार असल्याचे कळते.