Uncategorized

काँग्रेस पक्षाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यास संयुक्त पत्रकार संघाचा बहिष्कार

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:कोणत्याही राजकीय पक्षास सामाजिक संघटनेस आपण केलेल्या किंवा करणार असलेल्या सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उपक्रमाबद्दल ची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता भासते उमरखेड तालुक्याच्या पातळीवर काँग्रेस पक्षातर्फे सहसा पत्रकार परिषद घेतल्या जात नाही आणि एखादी पत्रकार परिषद घेतलीच तर त्यात मोजक्याच पत्रकार संघटनांना बोलविल्या जाते.
काही कालावधी पूर्वी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या मर्जीतील पत्रकार संघांना आयोजकांनी आमंत्रित केले परंतु संयुक्त पत्रकार संघ उमरखेड यांना डावलले. संयुक्त पत्रकार संघ हा डॅशिंग पत्रकार संघ म्हणून ओळखल्या जातो कुठेही घडलेल्या किंवा झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता नावाप्रमाणेच संयुक्तरीत्या संघटित होऊन हा संघ अन्याय अत्याचाराविरुद्ध उभा असतो काँग्रेस पक्षाने संयुक्त पत्रकार संघास पत्रकार परिषदेस न बोलाविल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही बातम्या संघटनेचा कोणताही पदाधिकारी व सभासद प्रसिद्ध करणार नाही एकूणच काँग्रेस पक्षाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यावर बहिष्कार टाकला आहे हा ठराव संयुक्त पत्रकार संघटनेने आज दिनांक २२ मार्च २०२५ रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये एकमताने घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!