Uncategorized

उमरखेड तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक दिन साजरा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड, :- उमरखेड येथील तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड देवसरकर होते.

कार्यक्रयास प्रमुख पाहुणे म्हणून तहसिलदार श्री.सरूडकर, पुरवठा अधिकारी श्री.महाजन, नायब तहसिलदार विश्वंभर राणे, श्री.माने, ग्राहक मंचचे सचिव गिरीसर सुरेश काळे तसेच भारत कुळकर्णी, मजहर मामु, गणेश शिंदे, डॉ.घोडेकर, मिलींद कलाणे, श्री. पांडे उपस्थित होते.

सुरुवातीला दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अधक्ष ॲड. देवसरकर यांनी प्रशासनाकडून ग्राहक मंचला प्रोत्साहित करून ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असतांना तहसिलदार श्री.सुरडकर यांनी पांदन रस्ते प्रस्तावित करून सिमेंटचे करू तसेच ग्राहकांसाठी ग्राहक चळवळीस सर्वतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. यावेळी ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या. काही तक्रारी ऐकून घेण्यात आल्या नकली औषध साठ्याबाबत प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे. तालुका स्तरावर तशी कमेटी करण्यात यावी, अशी अपेक्षा ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन श्री.चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमास ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!