Uncategorized

उमरखेडच्या अनधिकृत ले -आऊट धारकाकडून दंड वसूल करा != चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकऱ्यांना निर्देश र्‍प्रत्येक निवेदनाची दखल घेतो – चंद्रशेखर बावनकुळे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

शहरातील खंड १ व २ मध्ये मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या अनधिकृत ले -आऊट धारकांना स्थानिक महसूल प्रशासनाने तक्रारीवरून जवळपास पाच कोटीच्यावर दंड केला मात्र वर्षभरानंतरही तो दंड वसूल करण्यास व त्यांचेवर कार्यवाही करण्यास प्रशासनाने तत्परता न दाखविल्याने तकारकर्ते शे. इरफान यांनी थेट महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखल केलेल्या तक्रारीवर कार्यवाही होईल का म्हणताच ” माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक निवेदनाची दखल घेतो ” असे सांगून उमरखेडच्या विषयी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्याने अनधिकृत ले -आऊट धारकावर कधी कार्यवाही होईल ह्याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे .
उमरखेड येथे महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत वरिल निर्देश दिले आहे .

मौजे उमरखेड खंड व २ मधील अनाधिकृत ले-आउट पाडुन विकी केली गेली आहे .याची तक्रार मुख्याधिकारी न.प.उमरखेड , तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना वारंवार करण्यात आल्या आहेत .त्यामुळे तत्कालीन तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी शहरातील विविध ठिकाणच्या १२४ च्यावर ले -आऊट धारकांना सव्वा ५ कोटी रुपयाच्यावर दंड केला . दंड केला मात्र वसुली व कार्यवाही केली नसल्याने

यांच्यावर चौकशी समिती गठीत करून तात्काळ बदली किंवा निलंबीत करण्यात यावे. तकार ची दखल घेवुन प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावे अधिकारीवर कठोर व तात्काळी गुन्हे दाखल करण्यात यावे न केल्यास ना इलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल.असा इशाराही यावेळी शे . इरफान यांनी दिला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!