Uncategorized

दोन माजी आमदारा सह असंख्य कार्यकर्त्यांचा प्रदेश अध्यक्ष वावनकुळे यांच्या उपस्थीतीत भाजपात पक्ष प्रवेश

॥ पक्ष प्रवेश केलेल्याना भाजपा कडुन सन्मानपूर्वक वागणुक देऊ = चंद्रशेखर बावनकुळे

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड = उमरखेड विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या दोन माजी आमदारानी आपल्या असंख्य कार्यकर्त्या सह भाजपा प्रदेश अध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत शणीवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी स्थानीक विश्राम गृहासमोरील बंगले आऊट मध्ये आयोजीत पक्ष प्रवेश सोहळ्यातभाजपा पक्षात प्रवेश घेतला
मागील काही काळा पासुन काँग्रेस पक्षात अंतर्गत सुरु असलेल्या धुस – पुसीला कंटाळत व पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सबका साथ । सबका विकास । या संकल्पनेला प्रभावीत होउन आपन आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह भाजपा जिल्हा समनव्यक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करीत असल्याचे मत माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर याणी यावेळी बोलताना मांडले तर काँग्रेस पक्षातील स्थानीक नेत्यांकडुन होणाऱ्या गळचेपी मुळे व्यथीत होउन काँग्रेस पक्षाला सोडत असल्याचे माजी आमदार विजय खडसे याणी यावेळी आपल्या भाषनातुनबोलताना सांगीतले व काँग्रेस पक्षातील स्थानीक नेत्यावर सडकुन टिका केली त्याच पद्धतीने माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रमेश चव्हान याणी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कारण या प्रसंगी बोलताना सांगत गेल्या अनेक वर्षा पासुन काँग्रेस पक्षासोबत निष्ठेने राहुन देखील स्थानीक काँग्रेसचे नेते आपलाला विचारात घेत नव्हते या सर्व प्रकाराला केवळ मी एकताच नव्हे तर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे व आमचे असंख्य कार्यकर्ते कंटाळले होते त्यामुळे आम्ही सर्वानी काँग्रेस पक्ष सोडुन भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगीतले व भाजपा नेतृत्व आम्हाला देईल ते काम आम्ही निष्ठेने पार पाडु अशी ग्वाही माजी आमदार प्रकाश पाटील याणी यावेळी देत पक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याना आम्हाला कुठलेही पद नका पन सन्मान द्या आगामी काळात होणाऱ्या नगरपरीषद, नगरपंचायती, जिल्हापरीषद यासह सहकारी क्षेत्रातील सर्व निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकु असा आत्मविश्वास देखील या वेळी दोन्ही माजी आमदारानी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढे यावेळी व्यक्त केला
प्रदेश अध्यक्ष तथा महसुल मंत्री बावनकुळे याणी पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्वाना भाजपा पक्षात सन्मान पुर्वक वागणुक मिळणार असल्याची ग्वाही या वेळी आपल्या भाषनातुन बोलताना दिली तर उमरखेड विधानसभेचे आमदार किसन वानखेडे याणी उमरखेड तालुक्यातील विवीध समस्यांचा पाडा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या समोर मांडत या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या कडे केलेल्या मागण्याना प्रतीसाद देत त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे अश्वासन प्रवेश सोहळ्या निमीत्त आयोजीत कार्यक्रमात बोलताना दिले . यावेळी व्यासपीठावर संजय कुटे, महादेव सुपारे, नितीन भुतडा, आमदार किसन वानखेडे, उत्तमराव इंगळे, नामदेव ससाने, आरती फुपाटे, सुदर्शन रावते, महेश काळेश्वरकर, जितेन्द्र पवार, अदीत्य माने, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थीत होते
आज पक्ष प्रवेश घेणाऱ्या प्रमुखामध्ये माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, रमेश चव्हान, माजी सभापती कृष्णा पाटील देवसरकर, माजी नगराध्यक्षा भावना उदावंत, बालाजी उदावंत, रमन रावते, बाळु सेठ भट्टड, विजय हरडफकर, किशोर वानखेडे, साहेबराव कदम हिवरेकर, जगदीश नरवाडे, माधव वैध, रमेश आडे, यांच्या सह अनेक कार्यकर्त्यानी यावेळी पक्ष प्रवेश घेतला,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!