Uncategorized

लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करावे तहसिलदार आर.यु. सुरडकर यांचे आवाहन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798386192

तालुक्यातील श्रावण बाळ, वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे. बँकेशी खातेक्रमांस तसेच मोबाईल क्रमांकास सुध्दा संलग्न करुन घ्यावे. ज्या लाभार्थ्यांनी बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड संलग्न केले नाही. त्या लाभार्थ्यांना पुढील महीन्यामध्ये डी.बी. टी. (D.B.T.) व्दारे अनुदान जाणार नाही. अनुदान न गेल्यास लाभार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील. तरी सर्व योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य आहे, असे आवाहन उमरखेड तहसिलदार आर यू सुरडकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!