Uncategorized

घे भरारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे SDO सखाराम मुळे यांच्या हस्ते उद्घाटन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनज येथे सालाबादाप्रमाणे “झेप घे भरारी” २०२५ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष हरिभाऊ वाळके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते उद्घाटक म्हणून सखाराम मुळे उपविभागीय अधिकारी साहेब व अनिल बर्डे मुळावा केंद्रप्रमुख तसेच सरपंच वनिताताई देवानंद पाचपुते, तंटामुक्तीचे अध्यक्ष आनाजी बोंबले, माजी उपसरपंच प्रकाश आमले, पोलीस पाटील बापूराव धनवे, दत्तप्रसाद जाधव, देवानंद पाचपुते विजय चव्हाण उपाध्यक्ष, माजी उपसरपंच चरण डोंगरे, पत्रकार ज्ञानेश्वर राठोड प्रमुख अतीथी म्हणून उपस्थित होते. तसेच सर्व शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य उपस्थित होते सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सखाराम मुळे SDO, अनिल बर्डे केंद्र प्रमुख मुळावा यांच्या हस्ते फित कापुन कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. हरिभाऊ वाळके शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मान्यवरांचचे

पुष्पगुच्छ देउन आदरपूर्वक स्वागत केले यावेळी सखारामजी मुळे साहेब एस डी ओ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हा परिषद शाळांनी आतापर्यंत उच्च विद्या विभुषित असे विद्यार्थी घडविले असल्याचा आतापर्यंत इतिहास आहे आणि धनज शाळेतील शिक्षक सुध्दा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पणाने कार्य करत आहेत
मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन भावी पिढीला घडवत आहेत असे गौरवोद्गार काढले. विद्यार्थीच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी सामुहीक रित्या घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल आनंद व्यक्त केला.यावेळी सर्व शाळेतील मुलांनी लावणी, देशभक्ती गाणे, भावगीत, लोकगकत, प्रबोधन पर नाटीका त्यात एज्युकेशनल शोले, शेतकरी आत्महत्या, व्यसनाधीनता यासारखे गंभीर विषयही सहजपणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सर यांनी केले तर वेशभूषेची जबाबदारी श्रीमती सोनटक्के मॅडम व गजानन देवकत्ते यांनी सांभाळली, साऊंड सिस्टीम वर सुरवसे सर व राजू गायकवाड यांनी काम केले तर सरावासाठी बालाजी वगळे व वायकुळे सरांनी परिश्रम घेतले. देवसरकर सर यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेश जोशी, विषय शिक्षक दादाराव वायकुळे, राजेंद्र पाटील, बालाजी वागळे सर ज्येष्ठ शिक्षक देवसरकर सर ज्येष्ठ शिक्षिका सोनटक्के मॅडम गजानन देवकते, विलास सुरवसे मदतनीस राजू गायकवाड, अध्यक्ष हरिभाऊ वाळके, उपाध्यक्ष विजय चव्हाण, गजानन राठोड, सदस्य अमोल जोगदंडे, मोबीन खान पठाण व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!