वेणी आधरपुस धरणाचे जलाशय वाढल्याने धरण झाले ओव्हरफ्लो!(महसूल प्रशासन यांची कोणतीही मदत नाही तहसीलदार यांची पूर पीडित गावाला दांडी)

या भागात आत्तापर्यंतच्या हलक्या आणि मध्यम पावसामुळे धरण भरले नव्हते परंतु रात्रीपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे पुसधरण ओव्हरफ्लो, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यात कासाळबेळ, आनंतवाडी ,थार ,दहिसावळी ,धनोडा, करंजखेड ,कौरवाडी ,शिरपूर, या गावांना पाण्याचा वेढा पडल्या असताना महसूल अधिकारी कोणीही उपस्थिती दाखवली नाही अनंतवाडी फिटर बंद असल्यामुळे कासाळबेळ सेवा नगर येथील लाईन बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहे यावर्षीचा पाऊस आज पर्यंत मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा झाला होता. परंतु शुक्रवारपासून चालू असलेल्या धुवाधार पावसामुळे अधरपूस व अप्परपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राऊ झालेल्या प्रचंड

पाऊसामुळे आज सकाळी अप्परपूस प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. सांडव्या वरून सद्यःस्थितीत 27 सेमी एवढा ओव्हरफ्लो सुरू आहे. त्या मुळे अधरपूस प्रकल्पाच्या जलाशयात पाणी साठ्यात वाढत झाल्याने पुस नदी काठावरील गावकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
16 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता 304.88 मी. एव्हढी पाणी पातळी झाली आहे. उपलब्ध पाणीसाठा 44.440 द.ल.घ.मी.
आहे.15ऑगस्ट पासून 31ऑगस्ट 2025 या कालावधीत 305.020 मी. एव्हढी पाणीपातळी प्रकल्पाच्या आरओएस नुसार ठेवायची आहे.त्या मुळे सद्यस्थितीत अधरपूस प्रकल्पाचे दोन गेट 25 से.मी.ने उघडलेले आहे. त्या द्वारे 54.00 क्युमेंक्सचा विसर्ग सुरु आहे. अप्परपूस प्रकल्पाचा ओव्हरफ्लो जसाही अधरपूस प्रकल्पात येऊन जशीही 305.020 मी.च्यावर पाणीपातळी जाईल, त्या वेळी जलाशयात येणाऱ्या येव्यानुसार कार्यकारी अभियंता यवतमाळ पाटबंधारे विभाग यवतमाळ यांच्या
आदेशा नुसार प्रकल्पातुन नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. त्या मुळे पुसनदी काठच्या वेणी (बु.),मोरथ, वाकोडी, सवना, कलगाव, महागाव, जुनूना, करंजखेड, वाघनाथ, थार, कवठा, हिवरा (संगम), धानोडा कासाळबेळ आणि दहिसावळी या गावातील नागरिकांना सतर्क राहण्या साठी इशारा देण्यात आला. या संदर्भात उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग क्र.4 महागाव यांनी कार्यकारी अधिकारी यवतमाळ पाटबंधारे विभाग,उपविभागीय अधिकारी उमरखेड,कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार तसेच महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना माहितीस्तव कळविण्यात आले आहे. नदी काठावरील लोकांनी घरातील आपले सामान सुरक्षित भागात आणून ठेवले आहे अशी कठीण परिस्थिती झाल्यामुळे शेतकऱ्याचे नदीकाठील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहे महसूल मंत्री व आमदार शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतील का?



