राज्यस्तरीय भजन–संगीत स्पर्धेत एस पी एल एस च्या चिमुकल्या सुरांची गगनभरारी

उमरखेड | प्रतिनिधी
संस्कार पोदार लर्न स्कूल, उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी भव्य राज्यस्तरीय भजन–संगीत स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्वरांजली जाधव, विधी कोडगीरवार, प्रणवी कदम, अनुष्का वाघमारे व आरोही जाधव या विद्यार्थिनींनी लयबद्धता साधून भजन सादरीकरण करत रसिकांची व परीक्षकांची मने जिंकून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये मनाचे स्थान पटकावले आहे.
राज्यभरातून अनेक शाळांनी सहभाग नोंदविलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला सामोरे जात भारतीय संगीत परंपरेची सखोल जाण असणारे संगीत शिक्षक परमानंद जाधव व संगीत शिक्षिका शारदा जाधव
यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थिनींनी नियमित व शिस्तबद्ध सराव करून हे यश संपादन करून संस्कार पोदर लर्न स्कूल उमरखेड ही शाळा शैक्षणिक, क्रीडा, कला त्याचबरोबर सांस्कृतिक वारसा जपून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध केले आहे. संगीत शिक्षकांचे मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल संचालक मंडळ, प्रिन्सिपल, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
या यशामुळे शाळेचे नाव राज्य सांस्कृतिक क्षेत्रात अधिक उज्ज्वल झाले असून, इतर विद्यार्थ्यांनाही कला व संगीत क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली आहे.



