उमरखेड दर्पण पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी सय्यद फारुख तर सचिव पदी सतीश कोल्हे यांची निवड

सहसंपादक शेख मुजाहिद मो. 7798306192
उमरखेड सय्यद रहीम राजा उमरखेड येथे शासकीय विश्रामगृह मध्ये दर्पण संपादक पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठित करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम माजी अध्यक्ष डॉक्टर आयुब खा पठाण यांनी संविधानाच्या प्रतीचे व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून सय्यद फारुख सय्यद दाऊद यांची निवड करण्यात आली सतीश कोल्हे यांची निवड करण्यात आली बाकी कार्यकारणी खालील प्रमाणे आहे उपाध्यक्ष शेख जमीर कार्याध्यक्ष पदी दिगाबर मनवर तर कोषाध्यक्ष सय्यद रहीम रजा तर सदस्य म्हणून सुभाष वाघाडे मौलाना शेख मदार शेख निसार कैलास आढागळे बुद्ध गोष ढोले शाहिद इकबाल दत्ता शिंगारे इत्यादी उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष डॉ.अय्युब खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांचा दर्पण दिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो परंतु दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या सहा जानेवारीच्या कुठल्याही दिनदर्शिकेवर त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही अशी खंत यांनी वेक्त केली यावेळी त्यांनी पत्रकार बाबत टोल नाक्या संदर्भामध्ये माननीय गडकरी साहेबांनी सर्व पत्रकारांना टोल फ्री करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही हा निर्णय घेण्यात यावा याकरिता दर्पण संघाच्या वतीने निवेदन देण्यात येईल अशी ही मत त्यांनी मांडले यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सय्यद फारूक सय्यद दाऊद यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक सतीश कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष वाघाडे यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



