उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी सै. पूजा अंबादास धुळे अर्ज दाखल

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील तमाम मायबाप जनतेच्या आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे सूचनानुसार आशीर्वादाने, सहकार्याने व विश्वासाने आज विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी एक जबाबदारी आहे, आणि तुमचं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास यामुळेच ही जबाबदारी पार पाडण्याची ताकद मिळते. आपल्या हक्कांसाठी, आपल्या प्रगतीसाठी आणि मतदार संघाच्या विकासासाठी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचा आशीर्वादच माझ्या कार्याची प्रेरणा आहे.
उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील आपली माणसं – तुमच्या विश्वास, आशीर्वाद आणि पाठिंब्यावर आजचा महत्त्वाचा टप्पा पार केला. 29/10/2024 रोजी, विधानसभेची उमेदवारी अधिकृतपणे तहसील कार्यालयात दाखल केली. तुमच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा माझा निर्धार आणखी मजबूत झाला आहे. चला, एकत्र येऊ आणि उमरखेड/ महागाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवू…!
आज पर्यंत मी आपण सर्वांची मराठा आरक्षण जनसेवा करत आहोत मी नेहमी तुमच्या सुखदुःखात धावून आलो मी आपणास विनंती करतो मला अजून पुढे चांगलं काम करण्याची आपण संधी द्यावी मी आपला एक मुलगी एक बहिण या नात्याने काम करत आहे आपण मला साथ द्यावी मतदारसंघातील अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत
आपल्या हक्काची
सै. पूजा अंबादास धुळे
उमरखेड – महागाव विधानसभा मतदारसंघ 82