आम आदमी पक्षाकडून सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी उपोषणास्त्र वापरण्याचा इशारा

महागाव प्रतिनिधी
मागील चार महिन्यापासून प्रभाग क्रमांक 11 व 16 मध्ये एकत्रित पाणीपुरवठा असून घरपोच पाणी पोहोचण्यासाठी प्रभाग क्रमांक ११ मध्ये नवीन बोअर मारण्याची आम आदमी पक्षाची मागणी प्रभाग क्रमांक अकरा व सोळा मधील नागरिकांना एक बोअर असून त्याला पाणी अत्यल्प प्रमाणात आहे व त्यावर एक एचपीची मोटार असून दररोज पाणी घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना नाहक त्रास होत आहे व अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अर्धा प्रभाग पाण्यापासून वंचित राहत आहे व लोकांमध्ये या एकत्रित पाणीपुरवठ्यामुळे भांडण तंटे वाद निर्माण होत आहेत व यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे व प्रभाग क्रमांक 11 मध्ये दुसरा बोअर मारणे अति आवश्यक असल्याकारणाने आम आदमी पक्षातर्फे तहसील कार्यालय महागांव व नगरपंचायत कार्यालय महागांव येथे निवेदनाद्वारे ही माहिती कळवण्यात आली व येत्या 16 एप्रिल पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास 17 एप्रिल पासून प्रभाग क्रमांक 11 व 16 मधील सर्व नागरिकांसोबत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला व यावेळी प्रभाग क्रमांक पाच चे शिवसेना नगरसेवक रामराव पाटील नरवाडे सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील नरवाडे नगरपंचायत कर्मचारी कैलास पाटे आम आदमी पक्ष तालुका कार्यकारणी मध्ये तालुका उपाध्यक्ष आप विवेक राजेंद्र नरवाडे शहराध्यक्ष दीपक तायवाडे शहर उपाध्यक्ष सिद्धांत डोंगरे शहर उपाध्यक्ष आकाश कावळे शहर उपाध्यक्ष अभिजीत बहादुरे शहर उपाध्यक्ष अमय पाटे अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष स्वप्निल कावळे क्रीडा अध्यक्ष रतिश सांगडे युवा आघाडी अध्यक्ष रुद्र दळवे साहेबराव कांबळे युवा फोर्स उपाध्यक्ष शाम तायवाडे सामाजिक कार्यकर्ते चंदू भाऊ सामाजिक कार्यकर्ते रियाज शेख व इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते