Uncategorized

महसूल पथकावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या हल्लाखोरांना तात्काळ अटक करा :

.

विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग, उमरखेड यांची एसडीओ ला निवेदनातून मागणी .

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

गौण खनिज तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या फुलसावंगी मंडळातील महसूल पथकावर रेती व माती माफीयांनी जीवघेणा हल्ला करून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना  मोजे काळी (टेंभी ) येथे काल रात्री 10 वाजताच्या दरम्यान घडली त्या घटनेतील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याकरिता विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग, उमरखेड संघटनानी दि 21 डिसेबंर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले .

दि 20 डिसेंबर रोजी मोजा काळी (टेंभी ) ता महागांव येथे रात्री 10 वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टरची तपासणी मंडळात करीत असताना महसूल पथकांवर प्राण घातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये मंडळअधिकारी संजय नरवाडे , तलाठी गणेश मोळके व वाहन चालक महादेव आडे यांच्यावर अंदाजे 15 ते 20 हल्लेखोरांनी प्राण घातक हल्ला केला असून त्यामध्ये तलाठी गणेश मोळके यांच्या डोक्याला व पायाला रॉडने मारहाण करून रक्तबंबळ करण्यात आले असून त्यांना रात्री ग्रामीण रुग्णालय सवना येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले परंतु
त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी तलाठी मोळके यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठवण्यात आले सदर घटनेचा विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग उमरखेड तीव्र निषेध व्यक्त करीत घटनेतील हल्लाखोरांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवतील असे निवेदनातून इशारा देण्यात

चौकट ।

तलाठी संघटनेची निवेदनातून मागणी

रात्री बे रात्री महसूल कर्मचाऱ्यांना गौण खनिज पथकामध्ये कर्तव्य बजावत असताना पथकांमध्ये नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी व पोलीस बंदोबस्त , शासकीय वाहन असल्याशिवाय येथील उपविभागातील एकही तलाठी गौण खनिज कारवाई करणार नाही असे निवेदनातून सांगण्यात आले यावेळी विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग सर्व तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!