Uncategorized

सातधरी आश्रम शाळेच्या १६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार राठोड सहकार्याचे फळ


महागाव, प्रतिनिधी : संजय नागरगोजे
स्व. बाबासाहेब नाईक आश्रम शाळा, सातधरी येथील विद्यार्थ्यांनी सन २०२६ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांच्या मार्गदर्शनासह मोलाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन व परीक्षेची प्रभावी तयारी मिळाली. त्याचा परिणाम म्हणून शाळेच्या एकूण १६ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पवन रवी जाधव (७१.३३%), रागिणी रोहिदास जाधव (८६.६६%), राणी विलास चव्हाण (८२.००%), तन्वी सुशील राठोड (७६.६६%), स्वाती मंगल राठोड (७९.३३%) आणि वैष्णवी दरबारसिंग तागरे (८०.६६%) यांनी यश संपादन केले.
तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अक्षय तुबार जाधव (७४.००%), दीपिका विजय जाधव (७२.००%), जीवन मंगल चव्हाण (७२.००%), मोहिनी प्रमोद राठोड (७०.००%), नंदणी राहुल जाधव (६७.३३%), राजेश मांगीलाल राठोड (७०.००%), तनमय प्रवीण जाधव (६९.३३%), तन्वी सुरेश कांबळे (६४.००%), तन्वी रवी राठोड (७२.६६%) आणि तेजस्विनी विनोद पवार (७२.००%) यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच मुख्याध्यापकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांचे प्रोत्साहन व सामाजिक कार्यकर्ते रमेश राठोड यांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभल्याची भावना शाळा प्रशासनाने व्यक्त केली. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button