Uncategorized

शहराध्यक्ष अतुल खंदारे यांच्या नेतृत्वात आगामी उमरखेड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा सज्ज

नवीन युवा चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता ?

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये निवडणूक होण्याची शक्यता असून याकरिता भारतीय जनता पक्षाचे उमरखेड शहराध्यक्ष अतुल खंदारे यांनी प्रतिनिधीला मुलाखत देताना सांगितले की, निवडणुका कोणत्याही क्षणी जरी लागल्या तरी उमरखेड शहर भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी तयार असून उमरखेड नगर परिषदेवर भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना दाखविला. उमरखेड-महागाव विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा गड म्हणून ओळखल्या जातो. अशातच उमरखेड नगरपरिषद च्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागांमध्ये व शहरात भाजपा ची सक्रिय प्रचार यंत्रणा आणि समर्पित कार्यकर्त्यांची फौज असलेले युवा नेतृत्व अतुल खंदारे आता येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज आहेत. आणि या निवडणूकित भारतीय जनता पार्टीने व भाजपा नेते श्री नितीन भाऊ भुतडा यांनी केलेल्या प्रचंड विकासाच्या बळावर तयारी करत आहे. येणाऱ्या नगरपरिषदच्या सर्व जागा जिंकण्यासाठी रणनीती सध्या निश्चित केली जात आहे. अतुल खंदारे हे शहराध्यक्ष झाल्यापासून व होण्यापूर्वी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष म्हणून भाजपाची ताकद उल्लेखनीय आहे. पक्षा कडे एका पेक्षा एक मजबूत आणि इच्छुक उमेदवार आहेत. त्याच वेळी अनेक इच्छुक उमेदवार देखील भाजपमध्ये सामील होण्यासाठी रांगेत उभे आहेत. ते सध्या पक्षश्रेष्ठीच्या संपर्कात आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा भाजपाची सत्ता नगरपरिषद वर खेचून आणण्यासाठी युवा नेतृत्व अतुल खंदारे व भाजपा शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सर्व मोर्चे प्रकोष्ट मेहनत संघटन पातळीवर कार्य करत आहे. प्रत्येक प्रभागात पाच ते दहा अधिक कष्टाळू कार्यकर्त्यांना त्यांच्या संबंधित प्रभागात राहून जनतेच्या मूलभूत सुविधाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अंतर्गत रस्ते, वीज, पाणी, गटार, आणि स्वच्छता यासारख्या कामावर विशेष लक्ष देऊन अतुल खंदारे यांनी त्यांच्या कष्टाळू कार्यकर्त्यांच्या आतापासूनच नगरपरिषद निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच युवा नेतृत्वांना नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात संधी दिल्या जाईल असे वक्तव्य त्यांनी केले. भारतीय जनता पक्ष उमरखेड च्या सर्व बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आगामी उमरखेड नगरपरिषद निवडणूक नवनियुक्त भाजपा शहराध्यक्ष अतुल खंदारे यांच्या नेतृत्वात लढल्या जाणार असून ही त्यांची परीक्षाच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!