Uncategorized

चिमुकल्या बालकांचा जि प शाळेमध्ये आनंद मेळावा संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील जि प शाळेमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन दिनांक २०/१/२०२५ रोजी करण्यात आले होते.
शाळेतील चार भिंतीच्या आतील शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना त्या चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण अवगत व्हावे दैनंदिन व्यवहारात काय घडामोडी होत असतात याची जाणीव व्हावी या हेतूने जि प शाळेतील विद्यार्थ्यांकरीता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदमेळाव्यामध्ये

विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल मध्ये आकर्षक सजावट करून कुणी भाजी पाला तर कुणी खायच्या वस्तू सिजवून आपले स्टॉल उभे केले. या आनंद मेळाव्याला पालक वर्गातून चांगला प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकी देऊन विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्याकरिता गावातील प्रतिष्ठित मुख्याध्यापक, सर, सहशिक्षक मॅडम तसेच गावातील महिला मंडळी व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहुल या आनंद मेळाव्यात आनंद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!